कोपरगाव तालुका
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना प्रयत्न करू -आ.काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकवीस दिवस देशात लॉकडाऊन करण्यात आले असून देशासह राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे नागरिक बाहेर पडायला तयार नाहीत त्यामुळे द्राक्षांना गिऱ्हाईक नाही.त्यामुळे द्राक्ष व्यापारी द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांकडून युरोप,बांगलादेश,रशिया आदी देशात निर्यात होणारी द्राक्ष दहा ते बारा रुपये किलो दराने खरेदी करीत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहे.
दरवर्षी द्राक्ष उत्पादक शेतकरी लहरी हवामाणाशी झगडत द्राक्ष पीक घेत असतात.द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी महागड्या रासायनिक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च येत असतो.
सध्या कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकवीस दिवस देशात लॉकडाऊन करण्यात आले असून देशासह राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्यामुळे नागरिक बाहेर पडायला तयार नाहीत त्यामुळे द्राक्षांना गिऱ्हाईक नाही.त्यामुळे द्राक्ष व्यापारी द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांकडून युरोप,बांगलादेश,रशिया आदी देशात निर्यात होणारी द्राक्ष दहा ते बारा रुपये किलो दराने खरेदी करीत असल्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले होते. याची दखल घेऊन आ.आशुतोष काळे यांनी काढणीला आलेल्या द्राक्षबागांची माहिती घेण्याचे आदेश आ.आशुतोष काळे यांनी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिले आहेत.कोपरगाव विधासभा मतदार संघातील ज्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची द्राक्ष काढणीला आली आहेत त्या शेतकऱ्यांना आपली द्राक्ष कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे विक्री होत नाही अशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून द्राक्षापासून बेदाणे निर्मितीसाठी प्रोत्साहन व अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
द्राक्षांची निर्यात सुरु करण्यासाठी ज्याप्रमाणे नागरिक सामाजिक अंतर ठेवून भाजीपाला तसेच जीवनाश्यक वस्तू खरेदी करीत आहे त्याचप्रमाने छोट्या मोठ्या द्राक्ष विक्रेत्यांकडून नागरिकांनी द्राक्ष खरेदी करता यावी यासाठी प्रयत्न सूरू आहे त्यामुळे द्राक्ष विक्रीला चालना मिळून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक गटातील कृषी सहाय्यकांना द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची माहिती तातडीने संकलित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार ज्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे द्राक्ष काढणीला आले आहेत अशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी संबंधित कृषी सहायकाशी संपर्क करून आपले नाव त्या यादीत आहे का नाही याची खातरजमा करून घ्यावी असे आवाहन आ.काळे यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.