जाहिरात-9423439946
आरोग्य

बेशिस्त नागरिकांवर कारवाई आवश्यक-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

इटली,अमेरिका आदी यूरोपीय देशांची कोरोना बाबतची दूरावस्था बघता देव धर्म, पूजा, नमाज इ. बाबी नागरिकांनी आपापल्या घरातच करावे. सर्वांची या लॉकडाऊन मध्ये आर्थिक हानी होणार याची जाणीव असून आपल्या शहराच्या हिताचे निर्णय घेण्यात येत असून यापुढे अत्यावश्यक सेवा किराणा दुकान, भाजीपाला,फळे, हि दुकाने आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार व रविवार या तीन दिवशी सकाळी १० ते २ सायंकाळी ५ ते ८ यावेळेत सुरु ठेवण्यात येतील नागरिकांनी त्याचे पालन करावे असे आवाहन कोपरगाव नगरपारेषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका बैठकीत केले आहे.

या बैठकीत मुख्याधिकारी प्रशांत सरोदे म्हणाले की,यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सेवा, पोलीस प्रशासन,महसूल प्रशासन यासह नागरिकांनी मोठे योगदान दिले आहे.

देशभरात सध्या करोना विषाणूमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रत्येक दिवशी देशातील महत्वाच्या शहरांमध्ये करोना बाधित रुग्ण सापडत आहेत. देशातील अनेक प्रगत राज्य या विषाणूच्या विळख्यात सापडली आहेत. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही.अशा परिस्थितीत दिल्लीतील प्रकरणाने अजून गांभीर्य वाढवले आहे.त्यामुळे जोखीम वाढली आहे.अशा परिस्थितीत शहरात फिरणाऱ्या नागरिकांचा कसा बंदोबस्त करावा या साठी नुकतीच सर्वपक्षीय बैठक कोपरगाव नगरपरिषदेने पालिका सभागृहात आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषद उपाध्यक्ष योगेश बागुल,आरोग्य सभापती अनिल आव्हाड, तहसीलदार योगेश चंद्रे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संतोष विधाते, उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, नगरपरिषद आरोग्य अधिकारी डॉ गायत्री कांडेकर, समन्वयक सुशांत घोडके, नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, किराणा मर्चंट व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे, व्यापारी महासंघाचे सुधीर डागा, तालुका केमिस्ट असोशिएशन चे अध्यक्ष मंदार पहाडे, भाजीपाला असोशिएशनचे गणेश लकारे, फळविक्रते प्रतिनिधी, चिकन मटन विक्रते प्रतिनिधी, पिठ गिरणी प्रतिनिधी चव्हाणके, पानी जार विक्रते प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.

देशात व राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु नागरिकांना अजूनही गांभीर्य नाही. आजरा बाबत प्रशासना सोबत पदाधिकारी यांनी देखील आपापल्या भागात जनजागृती करावी. आजाराची साखळी खंडित होणे या करिता सहकार्य करावे-तहसीलदार योगेश चंद्रे

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,शहरात आतापर्यंत नागरिकांनी चांगले सहकार्य केले आहे.मात्र काही नागरिक मात्र विनाकारण जुन्या चिठ्या-चपाट्या दाखवून पोलीस कर्मचारी यांना हैराण करत आहे.इटली व अमेरिकेत बेजाबदारीने वागणाऱ्या नागरिकांचे काय हाल झाले आहेत ते दूरदर्शन वाहिन्यांवर दाखवले जात आहे.कोरोना विषाणूने जगात किती दहशत माजवली आहे.त्या मुळे आता तरी गंभीर व्हा एवढीच वेळ आहे व सुरक्षा हीच आपल्या हातात आहे.सावधानता हाच बचाव असल्याने नागरिकांनी हि साथ सहज घेऊ नये.या पुढे आठवड्यातील मंगळवार.शुक्रवार व रविवारीच अत्यावाश्याक सेवा सुरू राहतील. त्यामुळे विनाकारण गर्दी करणारे कमी होतील असे आवाहन त्यांनी केले.उपस्थितांना दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत श्री नरेंद्र महिला बचतगटाने तयार केलेल्या कापडी मास्क वितरण करण्यात आले.उपस्थितांना पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मार्गदर्शन केले तर उपस्थितांचे स्वागत महारुद्र गालट यांनी केले.उपस्थितांचे आभार उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close