जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचल्याने पोटदुखी-सरपंच 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असतांना कोपरगावच्या माजी आमदारांनी कुठल्याही योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला नाही.याउलट आ.आशुतोष काळे यांनी तीन वर्षात शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोपरगाव तालुक्यातील हजारो गरजू लाभार्थ्यांना मिळवून दिला आहे.त्यामुळेच विरोधकांना खरी विरोधकांची पोटदुखी सुरु झाली असल्याचे प्रतिपादन बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे यांनी विवेक कोल्हे यांचे नाव घेऊन केली आहे.

   

“माजी आ.कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेले दोन हजार लाभार्थी होते तर आ.आशुतोष काळे यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेले आठ हजार लाभार्थी असून या आकडेवारीत जमीन-अस्मानाचा फरक आहे”-सरपंच गोपीनाथ रहाणे 

त्यांनी प्रसिध्दी पत्रकात पुढे म्हटले आहे की,सन-२०१४ ते २०१९ मध्ये माजी आमदारांकडे सर्व प्रकारची सत्ता असतांना देखील या पाच वर्षात संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना अशा सर्व योजना मिळून कोपरगाव तालुक्यातील केवळ दोन हजार दोनशे अकरा लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे.याउलट ३ जानेवारी २०२० ते १६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना  या योजनांचा कोपरगाव तालुक्यातील आठ हजार पाचशे पासष्ठ लाभार्थ्यांना आ.काळे यांनी लाभ मिळवून दिला असून येत्या काही दिवसात अजूनही एक हजार लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळणार आहे.

 

“माजी आ.कोल्हे यांनी निळवंडेच्या पाण्याच्या बाबतीत देखील संभ्रम निर्माण करून दुष्काळी गावातील नागरिकांना वेड्यात काढुन ५३ वर्ष शेती सिंचनाचे पाणी मिळून दिले नाही.मात्र याउलट आ.काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी कालवा कृती समितीच्या माध्यमातून दुष्काळी भागात आल्यावर जलपूजन केलं आहे”-गोपीनाथ रहाणे,सरपंच,बहादरपूर ग्रामपंचायत.

   ज्यांच्या कार्यकाळात गरजू लाभार्थ्यांना या योजनांचा अत्यल्प लाभ मिळाला त्याच्या चारपट लाभ आ.काळे यांनी तीन वर्षात गरजू लाभार्थ्यांना मिळवून दिला हे शासकीय आकडेवारी सांगते.तुमच्याकडे पाच वर्ष सत्ता असतांना जर दोनच हजार लाभार्थ्यांना लाभ मिळाला याउलट चार वर्षात हाच आकडा चार पटीने वाढला आहे यावरून  मोठ्या प्रमाणात लाभाच्या योजनांपासून वंचित असणाऱ्या हजारो लाभार्थ्यांना पंचायत समिती,तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला असून यापुढील काळातही सर्वच पात्र लाभार्थ्यांना अशा योजनांचा लाभ मिळणार आहे.रेशन कार्ड धारकांना नियमित अन्न धान्य पुरवठा व्हावा याबाबत आ.काळे यांचे योग्य नियोजन सुरु असून रेशन कार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी देखील त्यांनी स्वत:ची यंत्रणा उभी केली आहे.

   मात्र नेहमीच राजकीय आकसापोटी नागरिकांची दिशाभूल करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची ज्यांना सवय आहे त्यांनी निळवंडेच्या पाण्याच्या बाबतीत देखील संभ्रम निर्माण करून दुष्काळी गावातील नागरिकांना वेड्यात काढुन ५३ वर्ष शेती सिंचनाचे पाणी मिळून दिले नाही.मात्र याउलट आ.काळे यांनी निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी कालवा कृती समितीच्या माध्यमातून दुष्काळी भागात आल्यावर जलपूजन केलं आहे.मात्र पिण्याचे पाणी लाभक्षेत्राबाहेर नेण्याचे पातक माजी आ.कोल्हे यांनी नेहमीच केले आहे.व वर्तमानात उच्च न्यायालयाच्या माध्यमातून सुरु आहे.तरीही नेहमीप्रमाणे कोणतेही योगदान नसतांना माजी आ.कोल्हे यांनी जलपूजन करून श्रेय घेण्याचा केविलवाणा  प्रयत्न केला होता.मात्र तर तळेगाव दिघे येथील काही शेतकऱ्यांनी काही श्रेयवाद्यांना त्यांना पिटाळून लावले होते त्याची जिल्ह्यात मोठी चर्चा झाली होती.कोणत्याही विकास कामात राजकारण करायचे हि त्यांची जुनी खोड असून योगदान नसतांना श्रेय घेण्यासाठी सर्वात पुढे राहून जनतेत संभ्रम निर्माण करीत असले तरी जनता त्यांना चांगलीच ओळखून असल्याचे गोपीनाथ रहाणे यांनी शेवटी म्हटले आहे.

माजी आ.कोल्हे यांना योजना समजण्यात पाच वर्ष खर्ची पडले

   माजी आ.कोल्हे यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेले दोन हजार लाभार्थी व आ. आशुतोष काळे यांच्या तीन वर्षाच्या कार्यकाळात शासनाच्या योजनांचा लाभ मिळालेले आठ हजार लाभार्थी असून या आकडेवारीत जमीन-अस्मानाचा फरक आहे-सरपंच गोपीनाथ राहणे 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close