जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘तो’फॉर्म बनावट,असे आदेश नाहीत-सचिव खंदारे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

मुंबई-(प्रतिनिधी)

शिधापत्रिका नसलेल्या कुटूंबाना रेशन दुकानावरून धान्य मिळण्यासाठी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार यांना एक फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन करणारा एक संदेश आणि फॉर्म चा नमुना समाज माध्यमावर पोस्ट केला जात आहे. परंतु, असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, किंवा असा कोणताही फॉर्म काढलेला नाही, असे स्पष्टीकरण अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव संजय खांदारे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

केंद्र सरकारने देशभर “एक राष्ट्र एक कार्ड” ही योजना लागू केलेली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड अणि त्रिपुरा या बारा राज्यातील रेशन कार्डाधारक यापैकी कुठल्याही राज्यात रेशन दुकानातून शिधा घेऊ शकतील, असे अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

करोना मुळे सध्या सुरू असलेल्या लॉकडाउन परिस्थितीत स्थलांतरित लोकांना रेशन पासून वंचित राहावे लागू नये यासाठी काही राजकीय पक्षांकडून एक फॉर्म प्रसिद्ध केला गेला. हा फॉर्म भरून दिल्यास ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांनाही रेशन दुकानावर धान्य मिळेल,असा दावा केला गेला आहे.

यासंदर्भात श्री खांदारे यांनी संगीतले की रेशनवरील धान्य मिळण्यासाठी रेशन कार्ड असणे ही प्राथमिक अट आहे. हे कार्ड नसेल तर धान्य मिळणार नाही.श्री खंदारे पुढे म्हणाले की, त्यांच्या विभागाने असा कुठलाही अर्ज नमुना प्रसिद्ध केलेला नाही की ज्याद्वारे कार्ड नसलेल्या लोकांना शिधा मिळेल.दरम्यान, केंद्र सरकारने देशभर “एक राष्ट्र एक कार्ड” ही योजना लागू केलेली आहे. या योजनेनुसार महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाणा, गुजरात, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड अणि त्रिपुरा या बारा राज्यातील रेशन कार्डाधारक यापैकी कुठल्याही राज्यात रेशन दुकानातून शिधा घेऊ शकतील, असे अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी याधीच राज्यात अन्न धान्याचा आणि तेलाचा पुरेसा साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोकांनी घाबरून जाऊ नये आणि अन्न धान्याचा अनावश्यक साठा करु नये असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close