कोपरगाव तालुका
“होम कोरोंटाईन” शिक्का मारण्यास गलेल्या कर्मचाऱ्यास धक्काबुक्की !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना विषाणूंचा प्रसार होऊ नये यासाठी बाहेरून आलेल्या नागरिकास घरातच बंदिस्त ठेवण्यासाठी आवश्यक असलेला “होम कोरोंटाईनचा” शिक्का मारणे व मास्क लावण्यास सांगण्यास गेलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना कल्याण येथे नोकरीस असलेले मात्र कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीतील कायम निवासी असलेले आरोपी लक्ष्मीकांत कारभारी विघे व त्यांचे दोन मुले सौमित्र लक्ष्मीकांत विघे,सौरभ लक्ष्मीकांत विघे यांनी धक्काबुक्की केल्याचा गुन्हा कोपरगाव महसूल विभागाचे कर्मचारी रवींद्र नारायण देशमुख यांनी दाखल केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये काहि नागरिकांवर प्रतिबंध लावले आहे.त्या प्रतिबंधाचे पालन देर्डे-कोऱ्हाळे या गावी होत नसल्याची बाब काही नागरिकांनी तहसीलदारांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्यांनी आपले पथक या गावी पाठवले व त्या पथकातील कर्मचारी रवींद्र देशमुख यांनी आरोपी लक्ष्मीकांत विघे,त्यांची दोन मुले,सौमित्र विघे,सौरभ विघे यांना ते आपल्या तोंडास मास्क लावत नाही त्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव होईल अशी समज दिली असल्याचा राग येऊन त्यांनी आधी तलाठी व नंतर महसूल कर्मचारी यांना दमदाटी देऊन त्याना सरकारी कामात अडथळा आणला आहे.
देशभरात लॉकडाऊन असला तरीही नागरिकांकडून सुरक्षा सुचनांचे पालन होत नसल्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील कोरोना बाधिताची संख्या एक हजारावर गेली असून बळींची संख्याही २७ झाली आहे. रविवारी महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यु झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधून ८८ रुग्ण तंदुरुस्त होऊन घरी परतले असल्याचेही आरोग्य विभागाने म्हटले आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे.उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे,तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके.पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.परिस्थिती नियंत्रणात आहे.
आरोग्य मंत्रालयाच्यावतीने रोजच्या रोज देशभरातील स्थितीचा आणि कोरोनाबाधित तसेच एकूण परिस्थितीचा आढावा घेतला आहे. रविवारी सकाळी गुजरातमधून ५८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.या पार्श्वभूमीवर राज्यातील अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.अशा वेळी नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे अभिप्रेत असताना कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हा ळे ग्रामपंचायत हद्दीत मात्र कोपरगाव तालुका महसूल कर्मचाऱ्यांना नेमका उलटा अनुभव आला आहे.त्याचे झाले असे की,कोपरगावचे महसूल अधिकारी कोपरगावचे तहसीलदार यांचे आदेशाने आपले कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम चोख बजावत आहे.
देर्डे-कोऱ्हाळे येथील मूळ रहिवाशी लक्ष्मीकांत विघे हे कल्याण येथे नोकरी उदिमानिमित्त राहतात मात्र राज्यात व देशात कोरोनाची साथ सुरु झाल्यावर ते १८ मार्च रोजी आपल्या गावांवर आले जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात साथ रोग प्रतिबंध कायदा १८९७ अन्वये काहि नागरिकांवर प्रतिबंध लावले आहे.त्या प्रतिबंधाचे पालन देर्डे-कोऱ्हाळे या गावी होत नसल्याची बाब काही नागरिकांनी तहसीलदारांच्या लक्षात आणून दिली त्यानंतर त्यांनी आपले पथक या गावी पाठवले व त्या पथकातील कर्मचारी रवींद्र देशमुख यांनी आरोपी लक्ष्मीकांत विघे,त्यांची दोन मुले,सौमित्र विघे,सौरभ विघे यांना ते आपल्या तोंडास मास्क लावत नाही त्यामुळे या विषाणूंचा प्रादुर्भाव होईल अशी समज दिली.व घरात बसण्यासाठी “होम कोरोंटाईन” चा शिक्का मारून घेण्यास सांगितले असता आरोपीनी उलट या पथकातील सदस्यांना,”तुम्ही कोण समजून सांगणारे,आम्हाला त्याची गरज वाटत नाही.तुम्हीच येथून निघून जा” असे म्हणून सरकारी कर्मचारी रवींद्र देशमुख यांची सदऱ्याची कॉलर पकडून त्यांना धक्काबुक्की केल्याची गंभीर घटना घडली आहे.व सरकारी कामात अडथळा आणला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.९२/२०२० भा.द.वि.कलम ३५३,१८८(२),२६९,२७१ अन्वये आरोपी लक्ष्मीकांत विघे त्यांची मुले सौमित्र विघे,सौरभ विघे यांचा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.व आरोपी लक्ष्मीकांत विघे यांना व त्यांच्या दोन्ही मुलांना अटक केली आहे.