शैक्षणिक
कोपरगावात… या महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाचा नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शुक्रवार दिनांक ५ मे रोजी सकाळी १० वाजता आयोजित केला असून या मेळाव्यास माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी केले आहे.

सदर प्रसंगी माजी विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांपैकी एक कलावंत आणि यशस्वी व्यावसायिक असलेले अनिल गिड्डे यांचा स्वरसाधना हा सुरेल संगीतमय कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनातील सोनेरी क्षणांचे स्मरण तसेच महाविद्यालयाने मागील दहा वर्षात केलेल्या प्रगती आणि भविष्यातील उपाययोजनांबाबतही चिंतन केले जाईल,असे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.व्ही.सी.ठाणगे यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी डॉ.शैलेंद्र बनसोडे व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मनीष कोठारी,उपाध्यक्ष बापूसाहेब घेमूड व सचिव नितीन डोंगरे आदी उपस्थित होते.