निधन वार्ता
शाळीग्राम दाभाडे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील लक्ष्मणवाडी येथील मूळ रहिवाशी व सध्या जालना येथे रहिवाशी असलेले महावितरण कम्पनीतील सेवानिवृत्त अधिकारी शाळीग्राम आसाराम दाभाडे (वय-६५) यांचे नूकतेच जालना येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.शाळीग्राम दाभाडे हे नोकरीत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला होता.त्या साठी प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.कामगारांच्या अभ्यासपूर्ण समस्या मांडताना त्यांनी ए.बी.बर्धन यांच्या लाल बावटा कर्मचारी युनियन मध्ये प्रांतिक सेक्रेटरी पदावर काम केले होते.
स्व.शाळीग्राम दाभाडे यांचा जन्म संवत्सर ग्रामपंचायत हद्दीतील लक्षणवाडी येथे झालेला होता.त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संवत्सर येथे झाले होते.तर पदवी पर्यंतचे शिक्षण औरंगाबाद येथे झाले होते.त्यांनी पदवी नंतर वकिलीचे शिक्षण पूर्ण करूनही ते विधी क्षेत्रात न जाता ते महावितरण कंपनीत रुजू झाले होते.नोकरीत असताना त्यांनी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवला होता.त्या साठी प्रसंगी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.कामगारांच्या अभ्यासपूर्ण समस्या मांडताना त्यांनी ए.बी.बर्धन यांच्या लाल बावटा कर्मचारी युनियन मध्ये प्रांतिक सेक्रेटरी पदावर काम केले होते.त्यांच्यावर स्व.नामदेवराव परजणे यांच्या कार्याचा मोठा प्रभाव होता.जालना येथील विद्युत कंपनीच्या कामगार युनियन बँकेचे पाच वर्ष अध्यक्ष होते.जालना हे त्यांनी आपली कर्मभूमी मानली असली तरी त्यांनी जन्मभूमी संवत्सरकडे दुर्लक्ष होऊ दिले नव्हते.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.