शैक्षणिक
…या उद्योग समुहाचे वतीने कोपरगाव न.पा.शाळेस एल.सी.डी.

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात अनेक कुटुंब अर्थदुर्बल झाल्याने शालाबाह्य मुलांची समस्या गंभीर झाली असून शिक्षण घेणारे अनेक विद्यार्थी आर्थिक उत्पन्नासाठी शाळाबाह्य होत आहे हि गळती रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील उद्योजक कैलास ठोळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“शिक्षणहक्क कायदा लागू झाला त्याला सुमारे सहा वर्षे पूर्ण होत आहेत.कायद्याने हक्क मिळाला,तरी महाराष्ट्रात असंख्य मुले शाळाबाह्य आहेत हे एक कटू सत्य आहे.तर दोन वेळा शोधमोहिमा काढून ही संख्या काही हजारांतच असल्याचे सरकारचे म्हणणे.प्रश्न केवळ शाळाबाह्य मुलांची मोजदाद करण्याचा नाही तर ती मुले शाळेत येतील,तेथे टिकतील आणि सर्वच मुले खऱ्या अर्थाने शिकती होतील,हे पाहण्याचा आहे”-कैलास ठोळे,प्रसिद्ध उद्योजक,कोपरगाव.
कोपरगाव येथील ठोळे उद्योग समुहाच्या वतीने कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक एक साठी एल.सी.डी.प्रदान करण्याचा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे,लायनेस क्लबच्या माजी अध्यक्षा शोभना ठोळे,दिपा ठोळे,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,वसंत आव्हाड,उत्तम शहा,सुवालाल भंडारी,ह.भ.प.गन्नाथ महाराज थोरे,पेंटर दारुवाला,संजय को-हाळकर,सुभाष जोशी,माजी उपनगराध्यक्षा मिनल खांबेकर,डॉ.विलास आचारी,हेमचंद्र भवर आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर प्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या सभासदांचा सन्मान करण्यात आला.मुख्याध्यापिका सौ.तरवडे (बिबवे) यांनी शाळेच्या ऊपक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बंब यांनी केले तर स्वागत ऊपशिक्षीका भालेराव यांनी केले आहे तर सोमासे ताईं यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.