जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

‘त्या’ गावांनी कोपरगाव तालुक्या प्रमाणे सुविधा द्या-सूचना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

गोदावरी कालव्यांचे आवर्तन सुरु असतांना आवर्तनाचा लाभ अन्य गावाप्रमाणेच राहाता तालुक्यातील कोपरगाव विधानसभा मतदार संघाला जोडलेल्या अकरा गावांना देखील आवर्तनाचा लाभ समप्रमाणात दयावा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना राहाता येथे एका बैठकीत दिल्या आहेत.

राहाता तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभाग,महसूल विभाग,कृषी विभाग,आरोग्य विभाग,पंचायत समिती,वीज वितरण कंपनी,सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांची आढावा बैठक घेतली याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी राहाता तहसीलदार कुंदन हिरे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,गौतम बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब कोते,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे,पाटबंधारे विभागाचे महेश गायकवाड,वीज वितरणचे अभियंता विठ्ठल सोनवणे,दिनेश पाटील,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्के,डॉ.कुंदन गायकवाड,डॉ.स्वाती घोगरे,राहाता राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार सदाफळ,अनिल कोते,अरुण बोंबले,दिलीप चौधरी,अण्णासाहेब कोते,संजय धनवटे,शिवाजीराव जगताप,मच्छिंद्र चौधरी,डॉ.प्रदीप उगले,कोपरगाव मतदार संघात समाविष्ट असलेल्या राहाता तालुक्यातील ११ गावांचे तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी त्यांनी राहाता तालुक्यातील नागरीकांच्या विविध अडचणी व समस्या समजावून घेत या समस्या तातडीने सोडवण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.अकरा गावांमधील वाकडी,चितळी,पुणतांबा,रामपूरवाडी आदि महत्वाच्या रस्त्यांच्या कामांना निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. या अकरा गावात रस्त्यांचा अनुशेष जरी मोठा असला तरी पुढील काळात उर्वरित रस्त्यांसाठी निधी मिळवणार आहे. ज्या रस्त्यांची कामे सुरु आहेत त्या रस्त्यांवर आवश्यक त्या ठिकाणी पुल व मोऱ्यांची बांधकामे करण्याच्या सूचना सार्जनिक बांधकाम विभागाला दिल्या. महावितरण ज्याप्रमाणे गावठाणच्या विजेचे प्रश्न वेळेत सोडवितात तेवढीच तत्परता कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या विजेचे प्रश्न निर्माण झाल्यास दाखवावी. लसीकरणाचे योग्य नियोजन करा. नागरिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होणार नाही याची आरोग्य विभागाने काळजी घेण्याच्या सूचना शेवटी आ.काळे यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close