जाहिरात-9423439946
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ५३९ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात १३ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ५२६ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४३७ स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०६ तर अँटीजन तपासणीत १३,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०० असे एकूण अहवालात एकूण १९ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ८० जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यात व शहरात एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही हा मोठा दिलासा मानला जात असून टाळेबंदी उठविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ०५८ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ४११ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १९६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६३ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ६९ हजार ८८६ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ७९ हजार ५४४ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १७.२५ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार ४५१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९४.९७ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ५४ हजार ८८७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०८ हजार ७८५ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ४२ हजार ७५४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार ३४७ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार राज्यातही तेरा हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ रोडावली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे. हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना आज तालुक्यात गत दोन-तीन दिवसात एकही बळी गेला नाही हि बाब समाधान देणारी ठरली आहे.त्यामुळे आगामी काळ उज्वल असल्याचे दिसत असले तरी मात्र नगर जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यात समाविष्ठ होता आता नगर जिल्ह्यात सरकारने येत्या सात जून पर्यंत टाळेबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे व्यापारी व ज्यांचा रोजगार हिरावला गेला आहे असे नागरिक व व्यापारी संघटनांनीं समाधान व्यक्त केले आहे.दुसरीकडे लहान बालकांची कोरोनाची लाट कशी थोपवायची याचा विचार जिल्हा प्रशासनास करावा लागणार आहे.