शैक्षणिक
चासनळी येथील रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल जाहीर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एप्रिल २०२२ मध्ये घेतलेल्या १२वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर केला असून त्यात कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल निकाल नुकताच जाहीर झाला असून तो १०० टक्के लागला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कुमारी संधान दिपीका कचरू ८३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कुमार कटारे सार्थक राजेंद्र ८१.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.तसेच कुमार जाधव मयूर प्रकाश ७८.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इ.१२ वी विज्ञान शाखेचा निकाल १०० टक्के लागला असून कुमारी संधान दिपीका कचरू ८३.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कुमार कटारे सार्थक राजेंद्र ८१.३३ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला आहे.तसेच कुमार जाधव मयूर प्रकाश ७८.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.कुमारी गाढे करीना भारत या विद्यार्थिनीस भूगोल विषयात ९४ गुण मिळवून शिखर गाठले आहे व मराठी विषयात कुमारी आवारे साक्षी संतोष या विद्यार्थिनीस ९२ गुण मिळवुन महाविद्यालयाचे नाव उंच केले आहे.तसेच वाणिज्य शाखेचा निकालही १०० टक्के लागला असून कुमारी गावंड गायत्री संजय ७८.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तर कुमारी नाजगड सरिता मारुती ७८.६७ टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक राखला आहे. तसेच कुमारी वाघ जयश्री उत्तम ७६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच कुमार जगदाळे आदित्य अरुण या विद्यार्थ्याला पुस्तपालन आणि लेखाकर्म या विषयात ९५ गुण मिळवून विषयात आपले प्राविण्य दाखवले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव संजीव कुलकर्णी,चंद्रशेखर कुलकर्णी,संदीप रोहमारे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,सचिन चांदगुडे,मनीष गाडे,रामभाऊ गाडे,डॉ.विकास जामदार,चासनळी महाविदयालयाचे प्राचार्य एन.जी.बारे आदीनी यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.