जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालयास २२.७८ कोटींचा निधी मंजूर

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी राज्याच्या महा आघाडी सरकारने संवत्सर येथे ३० बेडचे ग्रामीण रुग्णालयासाठी व कर्मचारी वसाहतीसाठी २२.७८ कोटी निधी मंजूर केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

आरोग्याच्या बाबतीत सर्वांनी किती जागृत राहिले पाहिजे हे जीवघेण्या कोरोना महामारीने दाखवून दिले आहे.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यात आलेल्या अडचणी भविष्यात येऊ नये यासाठी आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी आ.काळे प्रयत्नरत होते. त्या प्रयत्नांना अपेक्षित यश देखील मिळाले आहे.

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयास महाविकास आघाडी सरकारने उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देवून १०० बेडचे उपजिल्हा रुग्णालय म्हणून मंजुरी देखील दिली आहे.तसेच माहेगाव देशमुख या ठिकाणी देखील प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रगतिपथावर आहे.

पूर्व भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा जवळच्या गावात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशातून तिळवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास मंत्रालय स्तरावरील मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. तालुक्याच्या पूर्व भागातील मोठी लोकसंख्या व विस्ताराने मोठे असलेल्या संवत्सर व लगतच्या पंचक्रोशीतील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ग्रामीण रुग्णालय गरजेचे होते.त्या प्रयत्नांना यश मिळून या ग्रामीण रुग्णालयासाठी १७.१५ कोटी,कर्मचारी वसाहतीसाठी ५.६३ कोटी असा एकूण २२.७८ कोटी निधीस महाविकास आघाडी सरकारने मंजूरी दिली आहे.

त्याबद्दल आ.काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close