जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

गांधी विचार संस्कार परीक्षेत कोपरगावच्या विद्यार्थ्यांचे यश

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव- (प्रतिनिधी)
गांधी फाउंडेशन जळगांव व स्थानिक के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेमध्ये सोमैया महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त करून एक सुवर्णपदक व दोन रौप्य पदके प्राप्त केली असल्याच्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.एस. यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

या परीक्षेत महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कु.जानवी निकम (तृतीय वर्ष विज्ञान) हीने नगर जिल्ह्यात तृतीय वर्ष विभागात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक व प्रमाणपत्र, तर मुस्तफा शहा (तृतीय वर्ष कला) याने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक तर कु.दिव्या साबणे (प्रथम वर्ष कला) हीने प्रथम वर्ष विभागात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक व प्रमाणपत्र मिळविले आहे.

या प्रसंगी परीक्षा समन्वयक प्रा.डॉ.जिभाऊ मोरे म्हणाले की,”उपरोक्त परीक्षेत सोमैया महाविद्यालयातील विद्यार्थी गेल्या १० वर्षांपासून भाग घेत आहेत.दोन वर्षे कोरोना साथीमुळे या परीक्षा विस्कळीत झाल्या होत्या.यंदा या परीक्षेत महाविद्यालयाच्या २८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कु.जानवी निकम (तृतीय वर्ष विज्ञान) हीने नगर जिल्ह्यात तृतीय वर्ष विभागात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक व प्रमाणपत्र, तर मुस्तफा शहा (तृतीय वर्ष कला) याने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक तर कु.दिव्या साबणे (प्रथम वर्ष कला) हीने प्रथम वर्ष विभागात द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक व प्रमाणपत्र मिळविले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव अॅड.संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव हस्ते गौरविण्यात आले.या प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.विजय ठाणगे,रजिस्ट्रार डॉ.अभिजीत नाईकवाडे,डॉ.संजय दवंगे,प्रा.निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close