शैक्षणिक
वसुंधरेची जपणूक करणे ही प्रत्येकाची जबाबदारी-..या प्राचार्यांचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात पृथ्वी हे आपले सर्वांचे घर आहे.मात्र भौतिक हव्यासापोटी बुद्धिमान माणसाने तिच्यावरच आक्रमणे करायला सुरुवात केली आहे.हि निष्काळजी दिवसेंदिवस अवास्तव वाढत चालली असून त्यातून अनेक पर्यावरणीय संकटे निर्माण होत असल्याचे प्रातिपादन प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी व्यक्त केले आहे.
“वसुंधरा बचाव मोहीम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष योगदान देणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने वृक्ष लागवड,प्लॅस्टिक बंदी,विज बचत या उपायांचे कटाक्षाने पालन करणे गरजेचे आहे”-प्राचार्य डॉ.रमेश सानप.
कोपरगाव येथील श्री.सद्गुरू गंगागीर महाराज महाविद्यालयात ‘जागतिक वसुंधरा दिना’निमित्त भौतिकशास्त्र विभागामार्फत आयोजित ‘वसुंधरा वाचवा ‘ या विषयावरील रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ.रमेश सानप यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.निलेश मालपुरे,वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बी.डी.वर्पे आदींसह अनेक प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वसुंधरा बचाव मोहीम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी विशेष योगदान देणे गरजेचे आहे.त्यादृष्टीने वृक्ष लागवड,प्लॅस्टिक बंदी,विज बचत या उपायांचे कटाक्षाने पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालय परिसरातील वृक्षांना पाणी घालून करण्यात आली.रांगोळी स्पर्धेत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन आपल्या आकर्षक व लक्षवेधी रांगोळीतून,’वसुंधरा वाचवा’ हा संदेश दिला.स्पर्धेचे परीक्षण डॉ.प्रतिभा रांधवणे व प्रा.डॉ.एस.बी. दवंगे यांनी केले.स्पर्धेतील प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त स्पर्धकांना प्राचार्य डॉ.सानप यांच्या हस्ते ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.जी.एन.काकडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डी.एस.मोरे यांनी केले तर प्रा.कु.के.डी.देवकर यांनी आभार मानले.