जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शाळेत लेखक आपल्या भेटीला उपक्रम संपन्न

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील सुशिलामाई काळे माध्यमिक व शिव बालक या विद्यालयात ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमा अंतर्गत प्रत्यक्ष लेखक दत्तात्रय विरकर यांनी हजेरी लावली आहे.त्याचे विद्यार्थीं आणि पालक आदींनी स्वागत केले आहे.

“वर्तमानातील विद्यार्थ्यांनी मोबाईल न खेळता मैदानी खेळ खेळावे.तांत्रिक जोड घेऊन जीवन जगावे.आपला छंद जोपसावा व आपले गुण ओळखून आपले भविष्य घडवावे.विद्यार्थ्यांना तुमच्या जीवनात सरस्वती प्राप्त करून लक्ष्मी मिळवा म्हणजे अभ्यास करून नोकरी व्यवसाय करा व संधी मिळाली तर सोडू नका”-दत्तात्रय वीरकर,लेखक,कोपरगाव.

‘थोरामोठ्यांच्या चरित्रातून जीवन जगण्याची प्रेरणा मिळते.वाचनामुळे जीवनाला योग्य दिशा लाभते.तरुण वयातच वाचन आणि लिखाण करण्याची प्रेरणा वाढवली पाहिजे.त्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन समृद्ध बनते त्यासाठी माध्यमिक शाळेत,’लेखक आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवला जातो.असाच उपक्रम कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील सुशिलामाई काळे विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक शिवाजीराव लावरे हे होते.

लेखक विरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सातवी व पाचवी मराठी पुस्तकातील तोडणी या पाठाचे लेखन व जाणीव करून दिली.ऊस तोडणी कामगारांची पालक व बालक याची व्यथा सांगितली व कष्ठाची जाणीव करून दिली.हल्लीच्या मुलांनी मोबाईल न खेळता मैदानी खेळ खेळावे.तांत्रिक जोड घेऊन जीवन जगावे.आपला छंद जोपसावा व आपले गुण ओळखून आपले भविष्य घडवावे.विद्यार्थ्यांना तुमच्या जीवनात सरस्वती प्राप्त करून लक्ष्मी मिळवा म्हणजे अभ्यास करून नोकरी व्यवसाय करा व संधी मिळाली तर सोडू नका.आपल्या वर्तुणुकीतूनच आपल्याला नोकऱ्या मिळणार आहेत त्यामुळे वर्तणूक चांगली ठेवा,विदयार्थ्यांनी नेहमी निरीक्षणक्षम असावे,आपल्या कार्यात सातत्य ठेवा फायदा होतोच असतो.माझ्या जीवनाची सुरुवात पळण्याच्या शर्यतीने झाली ती आज पर्यंत पळतच आहेत.शेवटी सर्वाशी प्रेमाने वागा,चांगली माणसे जोडा,व्यसनापासून दूर राहा असे आवाहन करून शेवटी हस्तलिखित,’बाप’ नावाची कविता वाचन करून सांगता केली.

सदर प्रसंगी श्री विरकर यांचा शाळेच्या वतीने देशमुख सर यांनी सत्कार केला आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली वारकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन पगारे सर यांनी केले आहे.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी व शिक्षक यांनी सहकार्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close