शैक्षणिक
निरोगी जीवनासाठी ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची गरज-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात व्यायाम हा फक्त तरुणांनी करायचा असल्याचा गैरसमज अनेकांच्या मनात निर्माण झालेला असून वस्तुतः हल्लीच्या युगात निरोगी आयुष्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना व्यायामाची अधिक गरज असल्याचे प्रतिपादन शारीरिक शिक्षण संचालक प्रा.सुभाष देशमुख यांनी कोपरगावात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे मात्र आपल्याकडे आरोग्य विषयक जागृतीबाबतची अनभिज्ञता वाढत आहे.सुशिक्षितांमध्ये आरोग्याच्या समस्या अधिक आहेत.शारीरिक संपती हीच सध्याच्या युगात महत्वाची गोष्ट आहे”-डॉ.रमेश सानप,प्राचार्य,श्री गंगागिरी महाराज महाविद्यालय कोपरगाव.
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयात जिमखाना विभागांतर्गत आयोजित ‘ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य’ या विषयावरील कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश सानप हे होते.
सदर प्रसंगी महाविद्यालयाचे आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक डॉ.निलेश मालपुरे,कला विभागाचे उपप्राचार्य डॉ.सुभाष रणधीर,वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ.विजय निकम,ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.गमे आदींसह ज्येष्ठ नागरिक,महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वयाच्या चाळीशीनंतर आरोग्याचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत.निरोगी जीवनासाठी सात्विक आहारा बरोबरच व्यायामाची गरज आहे.मात्र आपल्याकडे प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरातील उणीव समजली पाहिजे.शरीराची क्षमता ओळखून व्यायाम करणे हितावह आहे.ज्येष्ठ नागरिकांचे विविध आजार त्यासाठी आवश्यक व्यायाम व ते करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना समिती अध्यक्ष प्रा.सुनील सालके यांनी केले तर सूत्रसंचलन प्रा.श्रीमती छाया शिंदे यांनी केले.तर प्रा.सुनील काकडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.