शैक्षणिक
कोपरगावात एक दिवसीय महाविद्यालयीन कार्यशाळा संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय महाविद्यालय अध्यापक संघटना स्थानिक शाखा,कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१२ मार्च रोजी “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि महाविद्यालयांची भूमिका ” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.
“एकविसाव्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून ३४ वर्ष जुन्या १९८६ च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा,परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.२०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे”-डॉ.एस.पी.लवांडे,अध्यक्ष,महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ.
शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणात परिवर्तनात्मक सुधारणांना यात मोठा वाव देण्यात आला आहे.एकविसाव्या शतकातले हे पहिले शिक्षण धोरण असून ३४ वर्ष जुन्या १९८६ च्या शिक्षणावरच्या राष्ट्रीय धोरणाची जागा नवे धोरण घेणार आहे.सर्वांना संधी, निःपक्षपात,दर्जा, परवडणारे आणि उत्तरदायित्व या स्तंभा वर याची उभारणी करण्यात आली आहे.२०३० च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आली आहे.शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अधिक समग्र,बहू शाखीय,२१ व्या शतकाच्या गरजाना अनुरूप करत भारताचे चैतन्यशील प्रज्ञावंत समाज आणि जागतिक ज्ञान महासत्ता म्हणून परिवर्तन घडवण्याचा आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या आगळ्या क्षमता पुढे आणण्याचा या धोरणाचा उद्देश असून या पार्श्वभमुमीवर हि कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणुन महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ.एस.पी.लवांडे,प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,डॉ.रवींद्र जाधव,प्रा.विजय ठाणगे,कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे विश्वस्त संदिप रोहमारे,डॉ. प्रदीप मुटकुळे,डॉ.प्रकाश वाळुंज,डॉ.बी.आर.पवार,प्रा.पालवे,प्रा.नजन,जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.एस पी.लवांडे यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यावर विस्तृत मार्गदर्शन करतांना शिक्षण व्यवस्थेत कालानुरूप होणारे बदल व या बदलाला सामोरे जाण्यासाठी करावयाची उपाय-योजना यावर मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या अध्यक्षीय समारोपात डॉ.रविंद्र जाधव (अध्यक्ष, स्थानिक शाखा) यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजुन सांगताना या धोरणातील उणीवा मांडल्या आहेत. यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
कार्यशाळेचे प्रास्तविक स्थानिक शाखेचे सचिव डॉ.गणेश शिंदे यांनी केले आहे.सदर कार्यशाळेचे सूत्रसंचलन प्रो.जे.एस.मोरे यांनी तर आभार डॉ.एम.बी.खोसे यांनी मानले.