जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“कोपरगाव नगरपरिषदे मध्ये राष्ट्रीय लोक अदालत संपन्न”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आज शनिवार दि.१२मार्च रोजी कोपरगांव तालुका विधी सेवा समिती व कोपरगांव नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालत मार्फत कोपरगांव शहरातील थकीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी धारकाची वसुली प्रकरणाची तडजोडी करणेची मोहीम राबविण्यात आली आहे.

“दि.१ ते ११ मार्च २०२२ दरम्यान कर धारकानी आपल्या थकीत कराचा भरणा ८१ लाख ७० हजार ७२० रुपये केलेला आहे. तर आज आज शनिवार दि.१२ मार्च २०२२ रोजी रु.७ लाख ६६ हजार ५४९ रुपये कराची रक्कम वसुल झालेली आहे”-शांताराम गोसावी,मुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

सदर मोहिमेस कोपरगांव नगरपरिषद कार्यालयात सकाळी १० वाजेपासुन सुरुवात करण्यात आली होती.याकरिता कार्यालयात नागरिकांच्या सोयीकरिता एकुण ०७ कॅश काऊंटर लावण्यात आलेली होती.यासाठी एकुण ०९ पथकांची नियुक्ती करण्यात येऊन नागरिकांना माहिती देण्यासाठी व थकीत असलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याचे काम नेमणुक केलेल्या पालिकेच्या नियंत्रण अधिकारी आणि पथकातील कर्मचारी यांनी केले.

राष्ट्रीय लोक अदालत करिता पॅनल प्रमुख न्यायमुर्ती एल,एम.सय्यद,पॅनल सदस्य अॅड.एम.एस.भिडे,अॅड.ए.एस.आगवान आदी उपस्थित होते.सदर राष्ट्रीय लोक अदालतच्या कार्यवाहीसाठी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे,करनिरीक्षक श्वेता शिंदे,पल्लवी सुर्यवंशी,डिमांड धारक संजय तीरसे,आकाश दिनकर,राजेंद्र इंगळे,रत्नप्रभा अमोलिक,रविंद्र वाल्हेकर,अरुण थोरात,राजेंद्र शेलार यांच्यासह कर वसुली पथक प्रमुख व सर्व कर्मचारी यांनी सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close