निधन वार्ता
माजी पोलीस पाटील तळोले यांचे निधन
न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
संगमनेर तालुक्यातील औरंगपुर येथील माजी पोलिस पाटील बाबुराव काशिनाथ तळोले(वय-८७) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,तीन मुली,तीन बहिणी,सुना,नातवंडे,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संदिप तळोले,ऋषिकेश तळोले,दिपक तळोले यांचेे आजोबा तर संतोष तळोल यांचे चुलते व पोलीस पाटील दत्तात्रय तळोले यांचे ते वडील होते. त्यांच्या अंत्यविधीसाठी परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.