जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पाच लाखांचे कर्ज फेडण्यासाठी महिलेचा छळ,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथील सासर असलेल्या नवविवाहितेने आपल्या माहेराहून कर्ज फेडण्यासाठी ०५ लाख रुपये आणावे या साठी लग्न झाल्यापासून तीन महिन्यापासून महिलेचा मानसिक,शारीरिक छळ करून तिच्या अंगावरील स्रिधन काढून घेऊन तिला घरातून हाकलून दिल्या प्रकरणी आरोपी पती आरिफ इसाक पठाण,सासरे इसाक अब्बास पठाण,सासू नूरजहाँ पठाण आदींसह सात जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी महिला सिमरन आरिफ पठाण (वय-२०)हिने गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आपल्या नव्या सुनेला तिने माहेराहून सासरचे कर्ज फेडण्यासाठी ०५ लाख रुपये आणावे यासाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली होती.त्यासाठी तिला तिचा नवरा आरिफ पठाण,सासरे इसाक पठाण,सासू नूरजहाँ पठाण आदींनी रा.येसगाव आदिनीं लग्न झाले पासून तीन महिन्यानंतर दि.२० फेब्रुवारी २०२२ पासून दि.०९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मानसिक छळ सुरु केला होता.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरातील इंदिरानगर या उपनगरातील माहेर असलेल्या तरुणी सिमरन पठाण हिचे लग्न दि.२० फेब्रुवारी २०२२ पूर्वी तीन महिने येसगाव येथील तरुण आरिफ पठाण याचेशी मोठ्या आनंदात,थाटामाटात व वाजतगाजत फिर्यादी महिलेच्या आई-वडिलांनी लावून दिले होते.नव्या नवलाईचे नऊ दिवस संपल्यावर सदर तरुणीस आपल्या सासरचे खरे वास्तव समजू लागले होते.तिच्या सासरच्या लोकांवर कर्ज होते.त्यामुळे ते तणावात होते.त्यामुळे ते कर्ज फेडण्यासाठी त्यांनी जवळचा मार्ग अनुसरला होता.त्यांनी आपल्या नव्या सुनेला तिने माहेराहून सासरचे कर्ज फेडण्यासाठी ०५ लाख रुपये आणावे यासाठी दबाव वाढविण्यास सुरुवात केली होती.त्यासाठी तिला तिचा नवरा आरिफ पठाण,सासरे इसाक पठान,सासू नूरजहाँ पठाण,मोठा दीर असिफ इसाक पठाण,लहान दीर शरीफ पठाण,आजी सासू मदिना मोहमंद पठाण,मोठी जावं हिना असिफ पठाण सर्व रा.येसगाव आदिनीं लग्न झाले पासून तीन महिन्यानंतर दि.२० फेब्रुवारी २०२२ पासून दि.०९ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मानसिक छळ सुरु केला होता.त्यासाठी तिला शिवीगाळ करणे,वेळोवेळी शारीरिक मानसिक छळ करणे,उपाशी पोटी ठेवणे,मारहाण करणे,तिच्या अंगावर घातलेले दागिने गळ्यातील पोत,पायातील चैन,काढून घेऊन तिला घरातून हाकलून दिले आहे.अशा आशयाची फिर्याद सदर तरुणी सिमरन पठाण हिने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दरम्यान तत्पूर्वी तिने नगर येथील महिला तक्रार निवारण केंद्र येथे पत्रव्यवहार करून समक्ष भेटून कार्यवाहीची मागणी केली होती.मात्र वेळो वेळी समज देऊनही आरोपींना काहीही उपयोग झाल्याचे दिसले नाही.परिणामस्वरूप महिला तक्रार निवारण केंद्र येथून पत्र घेऊन सदर फिर्यादी महिलेने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात याबाबत खबर दिली असून वरील आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक देसले,पोलीस उपनिरीक्षक भरत दाते आदींनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीसांनी या बाबत आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.४२४/२०२२ भा.द.वि.कलम ४९८ (अ) ४०६,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.नाईक बी.एस.कोरेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close