शैक्षणिक
सोमैय्या महाविद्यालयाची वरच्या राष्ट्रीय दहा महाविद्यालयात निवड

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नॅशनल लाईब्ररी अँड इन्फर्मेशन सर्व्हिस इन्फ्रास्ट्रक्चर फॉर्म स्कॉलरली कंटेंट या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने दरवर्षी ई-बुक,ई-जर्नल,ई-डेटाबेस एन-लिस्टचा वापर करणाऱ्या महाविद्यालयातून टॉप टेन महाविद्यालय निवडले जातात,त्या टॉप-टेन महाविद्यालयात चालू वर्षी के.जे.सोमैया महाविद्यालयाची निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संशोधकांनी आपापल्या विषयानुसार त्यांच्या संशोधन कार्यासाठी तसेच संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्यासाठी या डेटाबेस चा वापर केला असून तसेच विषयासंबंधी अपडेट माहिती ठेवण्यासाठी प्राध्यापकांनी याचा वापर केला आहे.
या प्रसंगी के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा.नीता शिंदे म्हणाल्या की,”उपरोक्त संस्था ही राष्ट्रीय पातळीवरील एक अशी संस्था आहे की,जी प्राध्यापक,संशोधक व विद्यार्थ्यांना ऑनलाइन ई-जर्नल्स्, ग्रंथ,लेख,निबंध आधी साहित्य उपलब्ध करत असते.त्यामुळे देशभरातील हजारो महाविद्यालय या संस्थेचे सभासद आहेत.यात प्रामुख्याने महाराष्ट्र,आसाम,आंध्र प्रदेश,मध्य प्रदेश,गुजरात आदी राज्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे. असा महाविद्यालयांची संख्या जवळपास ३२२० इतकी आहे. सोमैया महाविद्यालयाने एन-लिस्टचा सभासद आहे.
या महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संशोधकांनी आपापल्या विषयानुसार त्यांच्या संशोधन कार्यासाठी तसेच संशोधन पेपर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध करण्यासाठी या डेटाबेस चा वापर केला असून तसेच विषयासंबंधी अपडेट माहिती ठेवण्यासाठी प्राध्यापकांनी याचा वापर केला आहे.
या डेटाबेसचा वापर कसा करावा यासाठी ग्रंथपाल निता शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले असून विद्यार्थ्यांसाठी इंफार्मशन लिटरसी अंतर्गत एन-लिस्ट डेटाबेस चा कसा वापर करायचा याचे प्रशिक्षण दिले व त्यासाठी लागणारे मेंबर अकाउंट ची नोंदणी वैयक्तिकपणे करून दिली आहे.या डेटाबेसमध्ये प्रत्येक वापरकर्ते स्वतंत्र आय.डी. व पासवर्ड आहे.याचा जास्तीत जास्त वापर वाढावा याबाबत ग्रंथालयातून वेळोवेळी विशेष परिश्रम घेतले जातात.
सोमैया महाविद्यालयाच्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी व संदीप रोहमारे यांनी प्राचार्य,ग्रंथपाल व सर्व प्राध्यापक वर्गाचे अभिनंदन केले आहे.