जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

जवळकेत काळे गट अल्पमतात,आरक्षणामुळे सरपंचपद बचावले !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव कारभारी थोरात यांचेवर सात पैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार कोपरगाव यांचेकडे दाखल होता त्या बाबत आयोजित विशेष सभेत पाच सदस्यांनी सरपंच यांचे विरोधात मतदान केले असून केवळ दोन सदस्य काळे गटाच्या बाजूने राहिल्याने हि ग्रामपंचायत अल्पमतात आली असल्याचे उघड झाले असून याबाबत आपण वरिष्ठांकडे अपिलात जाणार असल्याची प्रतिक्रिया माजी सरपंच बंडोपंत थोरात,उपसरपंच मंदा थोरात यांनी आमच्या प्रतिनिधीकडे नोंदवली आहे.त्यामुळे हा राजकीय खेळ पुन्हा कोणते वळण घेतो या कडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान हि सभा आयोजित अकरा वाजता केली असताना ती सुरु झाली त्यावेळी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी या ठिकाणी ११.०८ वाजता आल्या मात्र कामकाज सुरु करण्यासाठी मात्र त्यांनी मंडलाधिकारी बाबा जेडगुले येई पर्यंत म्हणजेच १२.४४ वाजेपर्यंत कामकाज उशिरा सुरु केले या मागचे इंगित समजू शकले नाही.व या सभेचा निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी तब्बल सव्वा तीन वाजवले होते.हे कामकाज एका अज्ञात अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर दूरध्वनीवरून सुरु होते.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंम्बर २०१६ मध्ये संपन्न झाली होती.त्यावेळी राज्यात भाजप सरकार सत्तेत असल्याने त्यांनी जनतेतून सरपंच निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते.त्या प्रमाणे या निवडणुकीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे (आ.काळे गटाचे) सरपंच पदाचे उमेदवार बाबुराव थोरात यांना भाजप,परजणे तीन गटांनी एकत्र येऊन हि निवडणूक स्थानिक सत्यशोधक गटाविरुद्ध लढवली होती.त्यात मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा थोरात यांना मिळाला होता.व त्यात ते निवडून आले होते.व त्यांच्या सोबत विविध गटांचे अन्य चार सदस्य निवडून आले होते.तर स्थानिक सत्यशोधक या वैचारिक गटाचे बिन पैशाचे मतदारांनी निधी संकलन करून तीन सदस्य निवडून दिले होते.मात्र गत तीन वर्षात गावात नागरिकांच्या प्राथमिक गरजांची पुर्ती हा सत्ताधारी गट करू शकला नव्हता.व गावात एकही ठळक काम सरपंच थोरात यांना करता आले नव्हते.ग्रामस्थांची पायाभूत गरज या पदाधिकाऱ्यास पुरवता आली नाही त्यामुळे या गटातील तीन सदस्य नाराज होते त्यांनी याबाबत अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी बोलून दाखवूनही उपयोग झाला नव्हता त्यामुळे याबाबत माजी सरपंच बंडोपंत थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गटाला धक्का दिला होता.त्यांना भाजपचा व शिवसेनेच्या प्रत्येकी एक सदस्याने साथ दिली होती.मात्र त्यातील एक सदस्य गणेश भास्कर थोरात यांच्यावर राजकीय दबाव आणण्यात काळे गटाला यश मिळाले होते.त्यामुळे हा अविश्वास काळे गटाला केवळ सरपंच पद इतर मागास प्रवर्ग असल्याने जिंकता आला आहे.मात्र या संघर्षात काळे गट अल्पमतात आला आहे.आता या गटाकडे केवळ सात पैकी दोन सदस्य उरले आहे.याबाबत आमच्या प्रतिनिधीने काळे गटाचे बंडखोर माजी सरपंच बंडोपंत थोरात यांचेशी संपर्क साधला असता,त्यांनी आपण या बाबत वरिष्ठ संस्थेकडे अपिलात जाणार असल्याचे म्हटले आहे.व याबाबत आपला लढा कायम सुरु राहील अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

या अविश्वास ठरावाच्या बाजूने विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य कविता खंडू थोरात,उपसरपंच मंदा सुधाकर थोरात,यांचेसह स्थानिक सत्यशोधक पॅनलचे प्रकाश गोरक्षनाथ थोरात,विजय साहेबराव थोरात,श्रीमती मालती अनिल थोरात आदीं पाच सदस्यांनी पाठिंबा दिला आहे तर विश्वास दर्शक ठरावाचे बाजूने राजश्री सुधाकर थोरात,गणेश भास्कर थोरात,व सरपंच बाबूंराव थोरात आदींचे मते पडून केवळ राखीव पदामुळे काळे गटाचे प्राणावर बेतलेले संकट केवळ बोटावर निभावले आहे.व हा गट आता अल्पमतात आला असल्याने आगामी काळात काम करणे जिकरीचे जाणार आहे.

दरम्यान आज निवासी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषवले तर त्यांना ग्रामसेवक जयश्री शेलार व मंडलाधिकारी बाबा जेडगुले व तलाठी एम.आर.सानप यांनी सहाय्य केले आहे.

दरम्यान हि सभा आयोजित अकरा वाजता केली असताना ती सुरु झाली त्यावेळी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी या ठिकाणी ११.०८ वाजता आल्या मात्र कामकाज सुरु करण्यासाठी मात्र त्यांनी मंडलाधिकारी बाबा जेडगुले येई पर्यंत म्हणजेच १२.४४ वाजेपर्यंत कामकाज उशिरा सुरु केले या मागचे इंगित समजू शकले नाही.व या सभेचा निकाल जाहीर करण्यासाठी त्यांनी तब्बल सव्वा तीन वाजवले होते.हे कामकाज एका अज्ञात अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर दूरध्वनीवरून सुरु होते.तो पर्यंत सर्व सदस्यांना बाहेर दीड तास उपाशी पोटी बसवून ठेवले गेले असल्याचा आरोप उपस्थित सदस्यांनी केला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close