शैक्षणिक
एस.बी.आय.लॅबचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुणे येथील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या प्रशासनिक कार्यालय,कॉर्पोरेट सामाजिक दायित्व विभागाच्या ” बेटी बचाओ,बेटी पढाओ ” अभियानातर्गत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गर्ल्स गुरुकूल साठी ३४ अत्याधुनिक संगणक युक्त ” एस.बी.आय.लॅब ” चे लोकार्पण २० डिसेंबर स्टेट बॅकेच्या दक्षिण महाराष्ट्राच्या जनरल मॅनेजर श्रीमती सुखविंदर कौर यांचे हस्ते करण्यात आले आहे. तसेच यावेळी आत्मा मालिक हॉस्पिटल व जिल्हा शासकिय रुग्णालयासाठी कोविड १९ सुरक्षा साठी पी.पी.ई. किट प्रदान करण्यात आले आहे.
केवळ गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत “संगणक” ह्या चीजेने माणसाचे आयुष्य पार बदलून टाकले आहे.त्याची गरज ओळखून आत्मामालिक येथील विद्यालयाने आपली पावले त्यादिशेने टाकली आहे.हि संगणक प्रयोग शाळा हे त्याचे उदाहरण आहे.
आपल्या निसर्गदत्त बुद्धीचा व्यावहारिक दृष्ट्या अफाट विस्तार करायला प्रचंड मदत करू शकणाऱ्या “संगणक” ह्या चीजेचा शोध माणसाच्या तीक्ष्ण बुद्धीने सुमारे साठसत्तर वर्षांपूर्वी लावला.ती चीज अविश्वसनीय रीत्या अधिकाधिक प्रभावी करण्याचा माणसाचा उद्योग तेव्हापासून अविरतपणे चालू आहे.येत्या पन्नास,शंभर,पाचशे, हजार,वर्षात माणसाने संगणक किती प्रभावी केलेला असेल आणि त्यायोगे माणसाचे आयुष्य भविष्यकाळात कोणत्या प्रकारचे असेल ते पाहू शकणारा द्रष्टा ह्या पृथ्वीतलावर असणे अशक्य आहे. केवळ गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत “संगणक” ह्या चीजेने माणसाचे आयुष्य पार बदलून टाकले आहे.त्याची गरज ओळखून आत्मामालिक येथील विद्यालयाने आपली पावले त्यादिशेने टाकली आहे.हि संगणक प्रयोग शाळा हे त्याचे उदाहरण आहे.
या प्रसंगी बोलताना श्रीमती कौर म्हटल्या की, ‘बेटी बचाओ’ बेटी बढाओ’ या अभियानाला स्टेट बॅंकेने आपला पाठिंबा दिला असून त्याअंतर्गत मुलींनाही अत्याधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने स्टेट बॅकेने ही संगणक लॅब आत्मा मालिकला उभारून दिली आहे.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या अध्यात्मिक संस्काराच्या छायेत नवी पिढी घडत आहे.
सदर कार्यक्रमासाठी प्रसंगी राजीव गुप्ता, रजनिश वर्मा,मोहिते,मिश्रा,बी.जे.प्रसाद,ज्ञानेश्वर टाकळे इत्यादी स्टेट बॅक ऑफ इंडियाचे अधिकारी.आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाणचे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,विश्वस्त प्रकाश गिरमे,बाळासाहेब गोर्डे,श्रीधर गायकवाड,व्यवस्थापक हिरामण कोल्हे , सुधाकर मलिक,प्राचार्य माणिक जाधव,कांतीलाल पटेल,निरंजन डांगे,संदिप गायकवाड,नितिन सोनवणे,मिनाक्षी काकडे आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैष्णवी करंडे हिने मनोगत व्यक्त केले तर समीक्षा लोंढे,मयुरी खांडवी,तेजस्विनी पाटील,स्वराली खोडे व वैशाली या गुणवंत विद्यार्थीनींचा स्टेट बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच देसाई सर व तांबे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण चे सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे यांनी सद्गुरूंचा आत्म संदेश देवून उपस्थितीतांचे आभार मानले आहे.