कोपरगाव तालुका
माजी नगराध्यक्ष पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या वाढ दिवसानिमित्त त्यांच्या हस्ते मातोश्री प्रतिष्ठानच्या वतीने समतानगर,वृंदावननगर येथे खुल्या जागेत नुकतेच वृक्षारोपण मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचे अध्यक्षपदाची कालखंडात त्यांनी पालिका हद्दीत अनेक विकासकामे मार्गी लावली होती त्यामुळे ते जनतेच्या स्मरणात आहेत.
यावेळी वृंदावननगर मधील कार्यकर्ते रवींद्र खापेकर, मनोहर शिंदे,पाटील भाऊसाहेब,शिवाजी मगर,शरद शिंदे, विलास महिरे,मोहन रासकर,सुनील इंगळे, गणेश पवार, नवनाथ खापेकर ,श्री नेमाडे, सागर गायकवाड,ज्ञानेश्वर खैरनार,रमेश पवार,भाऊसाहेब मढवई,तुषार साठे,विक्की आहेर,मंगेश शिंदे,इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी नगरपरिषदेच्या खुल्या जागेमध्ये केशर आंबा व नारळ यांचे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण लोकप्रिय माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी त्यांचा सत्कार सन्माननीय शिवाजी मगर यांनी केला व तर रवींद्र खापेकर यांनी त्यांना केक भरवला. आभार प्रदर्शन भरतात शेळके केले आहे..
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक रवींद्र खापेकर यांनी केले तर मनोहर शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर आभार भरत शेळके यांनी मानले आहे.