शैक्षणिक
श्री.गोकुळचंद विद्यालय शालान्त परीक्षेचा निकाल जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरांतील शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या श्री.गो.विद्यालयाने दरवर्षी प्रमाणे यावर्षी नुकत्याच संपन्न झालेल्या शालांत परीक्षेच्या निकालात आपले वर्चस्व दाखवून दिले आहे.या वर्षाच्या शालांत परीक्षेसाठी विद्यालयातुन एकूण ३१४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी २९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यालयाचा एकूण शेकडा निकाल ९३.९४ टक्के लागला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थीचे कोपरगांवचे नायब तहसिलदार योगेश कोतवाल,विद्यालयांचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,माजी मुख्याध्यापक गवळी आर.डी,माजी उपमुख्याध्यापक कांबळे डी.एम.आदी मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.
या निकालात विशेष प्राविण्य श्रेणीत-१०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणी-१०४,द्वितिय श्रेणी-७२,पास श्रेणीत- १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.विद्यालयाच्यातुन यशाचे मानकरी म्हणून खालील विद्यार्थ्यांनी मान मिळवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांत प्रथम जाधव तेजस विष्णु हा-९६.२० टक्के गुण मिळवून प्रथम आला आहे.तर द्वितीय श्वेतम शंकर लबडे हा ९४.८० टक्के गुण मिळवून द्वितीय आला आहे.तर कुलकर्णी सक्षम महेंद्र हा ९३.८० टक्के गुण मिळवून तृतीय आला आहे. या विद्यालयात ९० % पेक्षा जास्त गुण मिळवणारे १४ विद्यार्थी आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.तर रवी पाटील यांनी स्वागत केले आहे.या कार्यक्रमात कोविड योध्दा व स्वच्छता म्हणून दुत सुशांत घोडके यांचा सत्कार केला आहे.कार्यक्रमाचे संचलन एस.डी.गोरे यांनी केले.या कार्यक्रमाला डी. व्ही.तुपसैंदर कार्ले सर,बडजाते सर,कोताडे सर आदी शिक्षक,पालक सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.