शैक्षणिक
धामोरी विद्यालयाचा निकाल ९६.०७ टक्के जाहीर
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे धामोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा शालांत परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या विद्यालयाचा निकाल ९६.०७ टक्के लागला आहे.यात विद्यालयामध्ये प्रथम क्रमांकाने आवारे अजित बाळासाहेब यास ९६.६० टक्के तर द्वितीय क्रमांकाने कु. शिंदे रुपाली बाबासाहेब ९५.६० % तर तृतीय क्रमांकाने कु.आवारे कनिष्का किरण ९२ टक्के मिळवून उत्तीर्ण झाले आहे.या खेरीज चतुर्थ क्रमांकाने कु. कुऱ्हाडे अंजली शंकर ९१.८० % पाचव्या क्रमांकाने कु.हाराळे प्राजक्ता सुभाष ९०.६० % मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
माध्यमिक विद्यालयातील यशस्वी विद्यार्थ्यांचे रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सल्लागार समितीचे अध्यक्ष आ.अशुतोष काळे,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर मोहनिराज कुलकर्णी व शालेय समितीचे सर्व सदस्य,मुख्याध्यापक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व सर्व ग्रामस्थांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.