जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुका हद्दीत सर्व गावात सार्वजनिक गणपतीस फाटा !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७०९ इतकी झाली आहे.त्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले असल्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरोना प्रतिबंध टाळण्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ५५ गावात जनजागृती घडवून सार्वजनिक गणपती न बसविण्यासाठी सर्व गणेश मंडळांना प्रवृत्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कोरोनामुळे अर्थचक्र रुतले असल्याने नागरिकांच्या आर्थिक समस्या आहेत.वर्गणी गोळा करण्यावरून वाद-विवाद होऊ शकतात याकडेही लक्ष वेधून घेतले होते.शिवाय सुरक्षित अंतर पाळणे,स्वागत करणे अवघड होऊन त्यात रुग्ण वाढ होऊ शकते,जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन होऊ शकते,व पोलिसांना अखेर पोलीस कारवाई करावी लागू शकते.त्याला बहुतांशी नागरिकांनी संमती दिली आहे-पो.नि.अनिल कटके

सध्या कोरोनाचा सर्वत्र प्रसार झाला असून कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०७ हजार ३४२ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३२ लाख ३९ हजार ०९६ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५९ हजार ६४५ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०७ लाख ०३ हजार ८२३ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २२ हजार ७९४ वर जाऊन पोहचला आहे.कोपरगाव शहरही त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यातही आतापर्यंत या साथीने ७०९ नागरिकांना आपल्या विळख्यात घेतले आहे.तर आतापर्यंत १४ जणांचा बळी घेतला आहे.या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आला असल्याने प्रशासनाची धाकधूक वाढली असल्यास नवल नाही.कोपरगाव तालुका पोलीस ठाणेही त्याला अपवाद नव्हते.त्यासाठी जिल्हा स्तरावरून जनजागृतीचे आदेश देऊन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी देऊन त्यांच्यात जनजागृती करण्याचे आदेश महिनाभरापूर्वी आधीच देण्यात आले होते.

त्यासाठी ठाणे प्रमुखांना बैठका घेण्याचे सांगण्यात आले होते.त्याला या मंडळांकडून किती प्रतिसाद मिळेल या बाबत अधिकारी सांशक होते.मात्र कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्धार करून बकरी ईद नंतर प्रत्येक गावात जाऊन त्या गावातील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते,जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक व गणेश मंडळांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या बैठका घेऊन त्यांना या सार्वजनिक गणपती महोत्सवाचे फायदे-तोटे समजावून सांगीतले आहे.वर्तमानात कोरोना साथीने उग्रस्वरूप धारण केले असून परिणामस्वरूप या महोत्सवामुळे समूह संसर्ग होऊ शकतो याची जाणीव करून दिली.व दर्शनासाठी आलेल्या नागरिकांना व त्यांच्या आरोग्यास धोका होऊन या साथीचा प्रसार होऊ शकतो.असे समजावून सांगितले गेले आहे.परिणामस्वरूप नागरिकांनी त्यांच्या सांगण्यातील सार समजावून घेतल्याने आज बऱ्याच गावात एक गावात एक गाव एक गणपती बसविले असताना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र एका गावात एकही सार्वजनिक गणपती नाही असे त्यांनी गौरवाने सांगितले आहे.शिवाय कोरोनामुळे अर्थचक्र रुतले असल्याने नागरिकांच्या आर्थिक समस्या आहेत.वर्गणी गोळा करण्यावरून वाद-विवाद होऊ शकतात याकडेही लक्ष वेधून घेतले होते.शिवाय सुरक्षित अंतर पाळणे,स्वागत करणे अवघड होऊन त्यात रुग्ण वाढ होऊ शकते,जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन होऊ शकते,व पोलिसांना अखेर पोलीस कारवाई करावी लागू शकते.त्याला बहुतांशी नागरिकांनी संमती दिली आहे.शिवाय गणेश उत्सवाची परंपरा खंडित होईल, व पुढील वर्षी गणपती मंडळांना गणपती बसवणे अवघड होईल हा गैरसमज काढुन टाकला आहे.या अभूतपूर्व साथीने शासन अशी कोणतीही अट लागू करणार नाही याचा खुलासा केलेला आहे.या खेरीज “एक गाव,एक गणपती” या मंडळाची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र बैठक घेतली आहे.

पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या प्रयत्नाला पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे,बिट अंमलदार,गोपनीय शाखेचे कर्मचारी चंद्रकांत तोर्वेकर,सर्व सरपंच,पदाधिकारी,पोलीस पाटील,गणेश मंडळांचे पदाधिकारी,यांचे अनमोल सहकार्य लाभल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close