जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शिक्षकांचा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याकडून गौरव 

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी) 

  अमेझॉन फ्युचर इंजिनिअर हा अमेझॉनचा एक महत्त्वाचा संगणक विज्ञान शिक्षण कार्यक्रम आहे जो सर्व तरुण आणि शिक्षकांना सर्वोत्तम भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी डिझाइन केलेला असून यात विशेष प्राविण्य मिळवले ल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या शिक्षकांना नुकतेच जिल्हा शिक्षण आधिकारी भास्कर पाटील यांनी नगर येथील हॉटेल राज पॅलेस येथे गौरविले आहे.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

ॲमेझॉन फ्यचुर इंजिनियर प्रकल्प-२०२३-२४ या वर्षापासून राबवला जात आहे.या प्रकल्पांतर्गत प्राथमिक शिक्षकांसाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग,स्क्रॅच कोडींग,सिक्वेंस्निग यांसारख्या घटकांवर ब्लेंडेड कोर्से तयार करण्यात आले होते.यात ज्यांनी कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले त्यांना गौरविण्यात आले आहे.त्यात कोपरगाव येथील शिक्षकांचा समावेश आहे.

  अमेझॉन फ्युचर इंजिनिअर हा अमेझॉनचा एक महत्त्वाचा संगणक विज्ञान शिक्षण कार्यक्रम आहे जो सर्व तरुणांना त्यांचे सर्वोत्तम भविष्य घडवण्याची संधी देण्यासाठी डिझाइन केलेला आहे,जगभरातील लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो आणि शिक्षित करतो.या कार्यक्रमाद्वारे,अमेझॉन जागतिक स्तरावर ऐतिहासिकदृष्ट्या कमी प्रतिनिधित्व असलेल्या समुदायांमधील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो.अमेझॉन फ्युचर इंजिनिअर वास्तविक जगापासून प्रेरित व्हर्च्युअल आणि व्यावहारिक संगणक विज्ञान प्रकल्प शिक्षण प्रदान करतो.हा कार्यक्रम अमेरिका,यूके,कॅनडा,फ्रान्स आणि भारतात उपलब्ध आहे.नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार विद्यार्थ्यांनी २१ व्या शतकातील कौशल्ये आत्मसात करावी व त्याबरोबरच मुलांमध्ये संगणकीय विचार,सहयोग,सांघिक कार्य,तार्किक कार्य आणि कोडींग याचे ज्ञान अवगत व्हावे,यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,संगमनेर,अहिल्यानगर,जिल्हा परिषद (प्राथमिक शिक्षण विभाग) अहिल्यानगर व लीडरशीप फॉर इक्विटी यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यानगर मध्ये ॲमेझॉन फ्यचुर इंजिनियर प्रकल्प-२०२३-२४ या वर्षापासून राबवला जात आहे.या प्रकल्पांतर्गत प्राथमिक शिक्षकांसाठी कॉम्प्युटेशनल थिंकिंग,स्क्रॅच कोडींग,सिक्वेंस्निग यांसारख्या घटकांवर ब्लेंडेड कोर्से तयार करण्यात आले होते.यात ज्यांनी कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे.या शिक्षकांना प्रत्येकी दोन टॅबलेट व प्रमाणपत्र जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले आहे.

  यावेळी जयश्री कार्ले (विस्तार अधिकारी ), रविराज निंबाळकर,दिलीप कासार (लेखाधिकारी,जि.प.अहिल्यानगर )व प्रा.रामेश्वर लोटके (डायट संगमनेर ) आदी मान्यवर उपस्थित होते.
 
   सदर प्रसंगी मुख्याध्यापक विलास माळी,सुनील रहाणे,अमोल कडू आदी मान्यवर उपस्थित होते.नगरपालिका शिक्षण मंडळ,कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकरी सुहास जगताप,कोपरगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, प्रशासनाधिकारी,सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी  यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close