शैक्षणिक
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाविद्यालयातर्फे नॅशनल फार्मसी एज्युकेशन डे च्या निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन ई-पोस्टर स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी पालघर,मुंबई,पुणे,छत्रपतीसंभाजी,कोल्हापूर,नाशिक,नांदेड ,बीड ,लातूर अहिल्यानगर आदी शहरातील फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

सदर प्रसंगी प्रथम पारितोषिक रुपये तीन हजार श्रुती नरवडे (एमव्हीपी कॉलेज ऑफ फार्मसी नाशिक) द्वितीय पारितोषिक रुपये दोन हजार वैष्णवी लोढा (आर.जे.एस. कॉलेज ऑफ फार्मसी कोपरगाव)आणि तृतीय पारितोषिक रुपये एक हजार श्रुती गवळी (मुळा एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी सोनई) येथील विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे.
दरम्यान या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील फार्मसी कॉलेजमधून १६२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये ४५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. दुसऱ्या फेरीसाठी विद्यार्थ्यांना व्हिडिओ बनवण्यास सांगण्यात आले.त्यानंतर त्याचे परीक्षण करून आणि विद्यार्थ्यांच्या गुणांनुसार तीन पारितोषिक देण्यात आली आहे.
या स्पर्धा साठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशन संचलित फार्मसी महाविद्यालयातर्फे पारितोषिक म्हणून रोख रक्कम व प्रमाणपत्र देण्यात आले.
राष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे,सचिव प्रसाद कातकडे,प्रसिद्ध उद्योजक विजय कडु,इंजिनीयर.दिपक कोटमे,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.नितीन जैन,उपप्राचार्य उषा जैन यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले यावेळी विजय कडु यांनी विद्यार्थ्यांना फार्मसी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून उच्च पदावरती जाण्याचे आवाहन केले.तसेच
दरम्यान सदर प्रसंगी प्राचार्य डॉ.नितीन जैन म्हणाले की,”आजच्या युगात औषधशास्त्राचे शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे.तेच आपल्याला हे उत्तम औषध तज्ञ बनवते यामुळे आपण आपल्या समाजाच्या आरोग्याला प्रोत्साहन देऊ शकतो तसेच समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे कार्य करू शकतो असे विद्यार्थ्यांना संबोधित केले.
स्पर्धेचे परीक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन जैन आणि उपप्राचार्य उषा जैन यांनी केले.पोस्टर स्पर्धांमध्ये, सर्जनशीलता आणि नाविन्याला महत्त्व दिले जाते. पोस्टरवर दिलेल्या विचारांचे स्पष्ट आणि प्रभावीपणे संप्रेषण होणे आवश्यक आहे.
सदर स्पर्धेचे आयोजन डिप्लोमा विभागप्रमुख.स्मिता शेटे,सहप्राध्यापक,श्वेता काळे,सहप्राध्यापक वैष्णवी लोखंडे,प्राध्यापक भारती कुचे,प्राध्यापक गायत्री राऊत, प्राध्यापक सोनाली राठोड यांनी केले असल्याची माहिती दिली आहे.