जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

कोपरगाव शहरातील..या प्रलंबित रस्त्यास प्रशासकीय मान्यता

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक या अत्यंत महत्वाच्या व वर्दळीच्या रस्त्याला २ कोटी १० लाख रूपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

कोपरगाव शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यांची अप्रिय राजकीय वगनाट्यामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.२८ कामांना हिरवा कंदील मिळाला असला तरी अद्याप बरीच कामे सुरु झाली नाही.त्याचा त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील उद्योग व्यावसायावर होवून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या या मान्यतेने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

कोपरगाव शहरातील प्रमुख मुख्य रस्त्यांची अप्रिय राजकीय वगनाट्यामुळे अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.२८ कामांना हिरवा कंदील मिळाला असला तरी अद्याप बरीच कामे सुरु झाली नाही.त्याचा त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या खराब रस्त्यांचा परिणाम शहरातील उद्योग व्यावसायावर होवून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.सर्वसामान्य नागरिक,महिला,जेष्ठ नागरिक व लहान मुलांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून कोपरगाव शहरातील नागरिकांना खराब रस्त्यामुळे होत असलेल्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी शहरातील महत्वाच्या विविध रस्त्यांसाठी ५ कोटी रुपये निधी कोपरगाव नगरपरिषदेला मिळवून दिला असल्याचे सांगितले जाते.त्याच बरोबर या निधीला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचा दावा केला जात आहे. त्या पाठपुराव्यातून अत्यंत महत्वाच्या असलेल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते डॉ.आंबेडकर स्मारक या धारणगाव रोडच्या रस्त्यासाठी २ कोटी १० लाख रूपये खर्चाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.त्यामुळे लवकरच रस्त्याचे काम सुरु होणार असून नागरिकांना होत असलेला त्रास कमी होणार आहे. बाजार पेठेवर देखील या खराब रस्त्यांचा परिणाम होत आहे.मात्र लवकरच उर्वरित छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते धारणगाव रोड (नागरे पेट्रोल पंप), छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते इंदिरापथ (गोकुळनगरी), श्री छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते आचारी हॉस्पिटल, या रस्त्यांच्या देखील निवेदा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून या रस्त्यांचे काम सुरु होणार असल्याचे आ. काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close