निधन वार्ता
संजय तिरसे यांना दुसरा धक्का

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषद येथील वसुली विभागातील जेष्ठ कर्मचारी संजय तिरसे यांच्या मातोश्री यांचे निधन होऊन काही दिवस उलटत नाही तोच त्यांना दुसरा धक्का बसला असून त्यांच्या धर्मपत्नी ज्योती संजय तिरसे (वय-५५) यांचे नुकतेच दुपारी ३.३० वाजता निधन झाले आहे.

स्व.ज्योती तिरसे यांच्यावर कोपरगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात एक अविवाहित मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.
स्व.ज्योती तिरसे या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून निवारा आणि परिसरात परिचित होत्या.यांच्या निधनाबद्दल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,संजय सातभाई,मुख्याधिकारी शांताराम गोसावी आदींनी दुःख व्यक्त केले आहे.