आरोग्य
कोपरगावात टाळेबंदी जाहीर करण्याची वेळ येऊन ठेपली ?

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ०४ हजार ४९७ इतकी आहे.तर सक्रिय रुग्णांची संख्या ५३९ असून आज पर्यंत ५२ जणांचे कोरोनाने निधन झाले आहे.त्यांचा मृत्यूचा दर हा १.१६ टक्के आहे.तर एकूण २४ हजार ३८२ जणांचे श्राव तपासणी करण्यात आली आहे.त्यांचा दर दहा लाखांचा दर हा ९७ हजार ५२८ असा राहिला आहे.त्या तपासणीचा बाधित दर हा १८.४४ टक्के आहे.तर उपचारानंतर बरे होणारी संख्या हि ०३ हजार ९६२ इतकी आहे. तर त्यांचा बरे होण्याचा दर ८८.१० टक्के इतका असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी दिली आहे.आज आलेल्या आकडेवारीने काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात आज आलेल्या एकूण-५६ बाधित रुग्णांत पुढील रुग्णांचा समावेश आहे.
कोपरगाव शहरातील ३४ रुग्ण पुढीलप्रमाणे कोपरगाव पुरुष वय-१४,४५,४०,४३,३४,३६,४६,२६,महिला वय-२४,१०,३४,३३,३०,रचना पार्क पुरुष वय-२८,५३,मोहिनीराज नगर पुरुष वय-५२,अंबिका नगर महिला वय-४२,स्वामीनगर पुरुष वय-३४,गांधीनगर महिला वय-२४,साईनगर पुरुष वय-३९,धारणगाव रोड पुरुष वय-८८,७७,दत्त बेकरी महिला वय-८०,लक्ष्मीनगर पुरुष वय-५८,गुरुद्वारा रोड महिला वय-७५,संजयनगर महिला वय-६८,सुभद्रा नगर पुरुष वय-५३,सप्तश्री मळा पुरुष वय-७२,महिला वय-६७,शंकरनगर महिला वय-६४,इंदिरा पथ पुरुष वय-५८,८५,बाजारतळ महिला वय-५५,जानकी विश्व महिला वय-२६,आदींचा समावेश आहे.
कोपरगाव तालुक्यातील ३३ बाधित रुग्ण पुढील प्रमाणे-कासली पुरुष वय-३५,३०,महिला वय-३२,१०,०८,माहेगाव पुरुष वय-२९,४९,४५,महिला वय-३६,कोकमठाण पुरुष वय-३२,तळेगाव मळे पुरुष वय-३०,दहिगाव पुरुष वय-२७,संवत्सर पुरुष वय-६४,चासनळी पुरुष वय-१८,सडे पुरुष वय-४९,धारणगाव पुरुष वय-७०,४९,कोळपेवाडी पुरुष वय-१९,महिला वय-२९,५९,ब्राम्हणगाव पुरुष वय-५७,भोजडे पुरुष वय-५२,सोनेवाडी पुरुष वय-६७,४५,ओगडी पुरुष वय-२४,मायगाव देवी पुरुष वय-५५,येसगाव पुरुष वय-५४,१७,२२,महिला वय-४८,७५,कुंभारी पुरुष वय-५७ आदींचा समावेश आहे.
आजपर्यंत कोरोना नीचांकी पातळीवर होता,मात्र आता या पुढील काळात सरकारने जाहीर केल्याप्रमाणे नागरिकांना लग्न,दहावे,अंत्यविधी आदी ठिकाणी गर्दीत जाण्याचे टाळावे लागणार आहे.या खेरीज बाहेर हॉटेल मध्ये जेवण गर्दीची ठिकाणी टाळावे लागणार असून गर्दीवर नियंत्रण आणण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असल्याचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले आहे.सरकारने तसे नुकतेच नवीन नियम जाहीर केले आहे.मात्र उत्तोरोत्तर रुग्णवाढीचा आळा घालण्यात अपयश येत आहे.त्यामुळे आता कोपरगाव सह दहावी-बारावी वगळता शाळा जिल्ह्याधिकाऱ्यांनी नुकत्याच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे तालुक्यात नागरिकांत मोठी चिंता वाढली आहे.