निधन वार्ता
माजी उपसरपंच भाकरे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील प्रगतशील शेतकरी व संवत्सरचे माजी उपसरपंच केशवराव आनंदराव भाकरे यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ७० वर्षे होते.त्यांच्यावर संवत्सर येथे गोदावरी काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
स्व.नामदेवराव परजणे पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून कै.भाकरे पंचक्रोशीत परिचित होते.महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे यांनी कै.भाकरे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रध्दांजली वाहिली आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी, सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या अंत्यविधीसाठी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.