निधन वार्ता
माजी सैनिक वाडेकर यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील निष्ठावान भाजपचे कार्यकर्ते येथील विनीत वाडेकर यांचे पिताश्री व माजी सैनिक राघवेंद्र वाडेकर (वय-८४) यांचे आज सकाळी ०८.४५ वाजेच्या सूमारास निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात २ मुले,१ मुलगी नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.राघवेंद्र वाडेकर यांनी भारतीय हवाई दलात सुमारे १७ वर्ष सेवा बजावली होती.त्यात त्यांनी सन-१९६२ व १९६७ च्या युद्धात सहभाग नोंदवला होता हे विशेष ! याखेरीज त्यांनी कोपरगाव येथील माजी सैनिक संघटना उभारणीत मोठे योगदान दिले होते.ते आपल्याला सेवेतून सन-१९७० साली सेवा निवृत्त झाले होते.
स्व.राघवेंद्र वाडेकर हे अत्यंत धार्मिक व मन मिळावू स्वभावाचे म्हणून परिसरात प्रसिद्ध होते.त्यांनी भारतीय हवाई दलात सुमारे १७ वर्ष सेवा बजावली होती.त्यात त्यांनी सन-१९६२ व १९६७ च्या युद्धात सहभाग नोंदवला होता हे विशेष ! याखेरीज त्यांनी कोपरगाव येथील माजी सैनिक संघटना उभारणीत मोठे योगदान दिले होते.ते आपल्याला सेवेतून सन-१९७० साली सेवा निवृत्त झाले होते.त्यात पुढे त्यांनी माजी सैनिक संघटनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी काही काळ सांभाळली होती.त्यांच्या पत्नीचे दीड वर्षापूर्वी निधन झाले होते.त्या नंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली होती.
त्यांच्यावर कोपरगाव येथील अमरधाम येथे दुपारी ५.३० वाजेच्या सुमारास गोदावरीतिरी अंत्यसंकार करण्यात आले आहे.त्यांच्या निधना बद्दल माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे भारत संचार निगमचे संचालक रवींद्र बोरावके,मोदी मंचचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,भाजप सोशल मीडिया सेलचे प्रदेश संघटक समीर आंबोरे,भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेव जाधव,सुभाष दवंगे,माजी तालुका सरचिटणीस राजेंद्र खिलारी,अड्.मच्छीन्द्र खिलारी,योगेश वाणी आदींनी दुःख व्यक्त केले आहे.