जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

कोपरगाव तालुक्यातील कार्यकर्ते भोसले यांचे निधन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)

संवत्सर येथील युवक कार्यकर्ते संतोष चांगदेव भोसले यांचे आज सोमवारी रोजी दीर्घ आजाराने निधन झाले आहे.मृत्यसमयी ते ४६ वर्षांचे होते.संवत्सर येथे गोदावरी काठावर त्यांच्यावर अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कै.संतोष भोसले हे संवत्सर परीसरात व तालुक्यात सर्वपरिचित होते.स्व.नामदेवराव परजणे यांच्या विचाराने प्रभावीत होऊन त्यांनी सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेले होते.सर्वांच्याच सुख-दुःखात धाऊन जाणारा युवक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.युवकांच्या चळवळीत त्यांचा हमखास सहभाग असायचा.त्यांच्या निधनामुळे घरातील व्यक्ती निघून गेल्याची हळहळ सर्वांच्याच मनाला लागून गेली.

संवत्सर गावांत त्यांच्या निधनाने सर्व ग्रामस्थ शोकमग्न झालेले दिसून आले.कै.भोसले यांच्यामागे आई वडील,बहीण,भाऊ,पत्नी,दोन मुली,एक मुलगा असा मोठा परिवार आहे.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधाममध्ये कै.भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मणराव साबळे यांच्यासह अनेकांनी कै. भोसले यांना श्रध्दांजली अर्पण केली.यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे पाटील,खंडू फेपाळे, सोमनाथ निरगुडे,लक्ष्मणराव परजणे,चंद्रकांत लोखंडे,दिलीप ढेपले,अनिल आचारी,शिवाजी गायकवाड,विजय आगवन,पोपटराव कर्पे,अविनाश गायकवाड,सतीश शेटे,बापू गायकवाड,बाळासाहेब दहे यांच्यासह सर्वपक्षिय कायकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close