निधन वार्ता
यादवराव कदम यांचे निधन

न्यूजसेवा
माहेगाव देशमुख-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील प्रगतशील शेतकरी यादवराव दगडू कदम (वय-९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांचा मागे दोन मुले,दोन मुली,सूना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.
स्व.यादवराव कदम हे अत्यन्त मनमिळाऊ व धार्मिक स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.ते को.सा.का.आसवणी प्रकल्पाचे कर्मचारी अशोकराव कदम व दिलीपराव कदम यांचे ते वडील होते.