निधन वार्ता
केशवराव बोठे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ कार्यकर्ते व प्रगतिशील शेतकरी व केशवराव त्रिंबकराव बोठे (वय-९२) यांचे नुकतेच वृद्धपकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पाच्छात एक मुलगा,दोन मुली,तीन भाऊ,एक बहीण असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.केशवराव बोठे यांनी गोदावरी दूध संघाचे माजी अध्यक्ष नामदेवराव परजणे यांचेसह माजी संचालक आर.एम.भिंगारे यांच्यासमवेत काम केले होते.कोल्हे-परजणे वादात त्यांनी नामदेवराव परजणे यांची साथ दिली होती.त्यांची जन्मभूमी येवला तालुक्यात असली तरी त्यांनी आपली कर्मभूमी करंजी हे गाव अखेरपणे मानली होती.
स्व.केशवराव बोठे हे प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.कुंभार गुरुजी यांचे शिष्य होते.त्यांनी आपल्या जीवनकार्यात विक्रमी ऊस उत्पादनांत अनेक वर्ष नाव कमावले होते.त्यांच्यावर करंजी येथे शोकाकूल वातावरणात थोड्या मान्यवरांसह सुरक्षित अंतर राखून अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांनी गोदावरी दूध संघाचे माजी अध्यक्ष नामदेवराव परजणे यांचेसह माजी संचालक आर.एम.भिंगारे यांच्यासमवेत काम केले होते.कोल्हे-परजणे वादात त्यांनी नामदेवराव परजणे यांची साथ दिली होती.त्यांची जन्मभूमी येवला तालुक्यात असली तरी त्यांनी आपली कर्मभूमी करंजी हे गाव अखेरपणे मानली होती.सामाजिक,राजकीय कामात त्यांचा दबदबा होता.ते पत्रकार शिवाजीराव गायकवाड यांचे जवळचे नातेवाईक होते.त्यांच्या निधनाबद्दल माजी मंत्री शंकरराव कोल्हे,काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,संजीवनींचे माजी संचालक भिंगारे नाना आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.