गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातील मंदिराची दानपेटी फोडून चोरी,गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीतील सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिराच्या सभा मंडपात असलेली दानपेटी फोडून तिच्यातील सुमारे दोन हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरून नेला असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यातील भक्तगणात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेगाव येथील चक्रधर स्वामी मंदिरात दानपेटीवर अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन दि.०४ मेच्या रात्री ०९ वाजेनंतर तर पहाटे चारच्या सुमारास कधीतरी ती दान पेटी व त्यातील रक्कम रोख दोन हजार रुपये चोरून नेली आहे.या बाबत फिर्याद अनंतराज राजधर महानुभव (वय-४९) रा.सुरेगाव यांनी पोलिसात दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत चक्रधर स्वामी यांचे मंदिर त्यांच्या शिष्यगणांनी बांधले आहे.त्या मंदिराला सभामंडप असून त्यात भाविकांच्या व मंदिर व्यवस्थापनाच्या सोयीसाठी दान पेटी बसविण्यात आलेली आहे.सदर दानपेटीवर अज्ञात चोरट्यानी पाळत ठेऊन दि.०४ मेच्या रात्री ०९ वाजेनंतर तर पहाटे चारच्या सुमारास कधीतरी ती दान पेटी व त्यातील रक्कम रोख दोन हजार रुपये चोरून नेली आहे.या बाबत फिर्याद अनंतराज राजधर महानुभव (वय-४९) रा.सुरेगाव यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केली आहे.याबाबत भाविक भक्तांनी या चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१४४/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन.भताने हे करीत आहेत.