निधन वार्ता
काशिनाथ पा.थोरात यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ रावबा थोरात (वय-८०) यांचें नूकतेच वृद्धापकाळामुळे निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात एक भाऊ,पत्नी,चार मुले,एक मुलगी असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यानी प्रतिकूल काळात आपल्या कुटुंबाला आधार देण्याचे काम केले होते.त्यांच्यावर जवळके ग्रामपंचायतीच्या अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार सुरक्षित अंतर राखून आप्तस्वकीयांनी केले आहे.ते जेष्ठ नेते विश्वनाथ थोरात यांचे जेष्ठ बंधू व रामनाथ थोरात व लक्ष्मण थोरात यांचे पिताश्री होते.त्यांच्या जवळके व परिसराच्या जडणघडणीत मोठा वाटा होता.