निधन वार्ता
बबनराव आंबोरे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रतिष्टीत व्यापारी व भाजपा सोशल मीडिया सेलचे प्रदेश संयोजक समीर आंबोरे यांचे चुलते बबनराव रामभाऊ आंबोरे वय-(७६) यांचे नूकतेच निधन झाले आहे.त्यांच्यावर कोपरगाव अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या पच्छात एक भाऊ,तीन मुले,दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.बबनराव आंबोरे हे अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून परिसरात परिचित होते.त्यांनी अत्यन्त प्रतिकूल वातावरणात आपल्या कुटुंबाला आधार दिला होता.त्यांच्या निधनाबद्दल नगराध्यक्ष विजय वहाडणे,भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रभाकर वाणी,भाजपचे प्रदेश कार्यकरिणी सदस्य रवींद्र बोरावके,माजी शहर प्रमुख विनायक गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,आदींनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.