कोपरगाव तालुका
कोपरगावात आजही चार जणांचा कोरोनाने मृत्यू,तपासणी साहित्याचा मोठा अभाव
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
दरम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून कोरोनाचे रुग्ण हि मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही बाधित नागरिकांना तपासणीसाठी आवश्यक साहित्याचा मोठा अभाव दिसून येत आहे.याबाबत आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊनही त्या पातळीवर अद्याप शुकशुकाट असल्याचे दिसत आहे.त्यामुळे तालुक्यात नेमके किती बाधित रुग्ण व बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले संशयित रुग्ण किती कोणालाही काही थांगपत्ता लागत नसल्याचे चित्र आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ६१ हजार ४२५ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २१ हजार १५१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ३८ हजार ४०१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०१ हजार ८७२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोपरगाव तालुक्यात २५ दिवसात ६७ जण दगावले आहे.तर शेकडो जण बाधित झाले आहे.मात्र कोरोना तपासणीसाठी आवश्यक संच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील बाधित रुग्णांची सर्व वाऱ्यावरील वरात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे कोरोना बाधित किती ? त्यांच्या संपर्कात आलेले किती.भरती किती? आणि खरे मृत्यू किती याचा कोणालाही काही मेळ लागण्याची चिन्हे सध्या तरी दिसून येत नाही.राजकीय नेतृत्वाने पालक मंत्री यांची भेट घेऊनही फार काही साध्य झाल्याचे दिसून येत नाही.या बाबत ते नेमकी काय भूमिका घेणार ? याकडे नागिकांचे लक्ष लागून राहिले आहे.