निधन वार्ता
चंद्रभागाबाई झांबरे यांचे निधन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
पुण्याचे पाटील राजेंद्र झांबरे यांच्या मातोश्री व कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष अड्.शंतनू धोर्डे यांच्या आत्या चंद्रभागाबाई वसंतराव झाबंरे (वय-९०) यांचे नूकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात,तीन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर पुण्यात शोकाकुल वातावरणात अंत्यसंकार करण्यात आले आहे.
त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले होते.त्या नंतर कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली होती.त्यांनी ती समर्थपणे सांभाळली होती.मध्ययुगात पुण्याची पाटीलकी ज्या काही निवडक कुटुंबाकडे होती त्यात या झांबरे कुटुंबाचा समावेश होता.त्यांच्याच जागेत ज्या ठिकाणी उत्तरेतून आलेल्या व औरंगजेबाचा सख्खा मामा असलेल्या शायिस्ताखानाची बोटे शिवाजी महाराजांनी छाटली होती तो ‘लाल किल्ला’ व पेशव्यांनी नंतर खरेदी केलेल्या जागेत ‘शनिवारवाडा’ बांधला होता.या दोन्ही जागा या झांबरे कुटुंबाकडे होत्या त्या नंतर खरेदी करण्यात येऊन या वास्तू उभारण्यात आल्याची माहिती अड्.शंतनू धोर्डे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.