निधन वार्ता
तहसीलदार पाटील यांना पितृशोक
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
श्रीरामपूर तहसील कार्यालयाचे तहसीलदार प्रशांत पाटील यांचे वडील रघुनाथराव पाटील ( वय -७७) यांचे बुधवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
स्व.रघुनाथराव पाटील यांनी अनेक वर्षे नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राचार्य म्हणून काम केले होते.त्यांचे पश्चात दोन मुले दोन मुली सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.