जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मढी खुर्द नजीक अपघात,महिला ठार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द नजीक मुंबई-शिर्डी या राज्यमार्गावर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास एक कंटेनर व होंडा सिटी कार यांच्यात आमनेसामने जोरदार धडक होऊन त्या कार मधील मुंबई येथील महिला जागीच ठार झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.मात्र उपचारार्थ या महिलेला सिन्नर येथे भरती केल्याने हा गुन्हा अद्याप इकडे कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वर्ग झालेला नसल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

गुरुवार दि.२४ डिसेंबर च्या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास झाली आहे.यातील अपघातग्रस्त एक वाहन मोठा कंटेनर असून दुसरे वाहन हे होंडा सिटी हि कार आहे.अवजड कंटेनर हा सिन्नर कडून शिर्डीकडे येत होता.तर होंडा सिटी कार हि शिर्डी कडून नाशिककडे जात होती.हा कंटेनर आधी कारवर धडकला व नंतर महावितरण कंपनीच्या पोलवर धडकला आहे.यात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.

शिर्डी-मुंबई हा मार्ग आता राज्यमार्गातून राष्ट्रीय मार्गात वर्ग करण्याची घोषणा सन २०१४ साली झाली होती.हा मार्ग आता चौपदरी होत असून या मार्गाचे गत दोन वर्षांपूर्वी काम झाले असून या मार्गावर वाहनांचा वेग प्रचंड असतो त्यातून अनेक अपघात होत असतात.अशीच घटना गुरुवार दि.२४ डिसेंबर च्या रात्री ८.३० वाजेच्या सुमारास झाली आहे.

यातील अपघातग्रस्त एक वाहन मोठा कंटेनर असून दुसरे वाहन हे होंडा सिटी हि कार आहे.अवजड कंटेनर हा सिन्नर कडून शिर्डीकडे येत होता.तर होंडा सिटी कार हि शिर्डी कडून नाशिककडे जात होती.हा कंटेनर आधी कारवर धडकला व नंतर महावितरण कंपनीच्या पोलवर धडकला आहे.यात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे.घटनास्थळावरून जखमी महिलेस सिन्नर कडे उपचारार्थ नेण्यात आले आहे.

तेथे शून्य क्रमांकाने गुन्हा नोंदणी करण्यात आला आहे.तो नंतर कोपरगाव येथे वर्ग होण्याची शक्यता आहे.या दुर्घटनेत महिला ठार झाल्याचे विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.मात्र त्यांचे नाव व गाडी क्रमांक उपलब्ध होऊ शकले नाही.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close