कोपरगाव तालुका
आपदग्रस्तांना मदत मिळवून देऊ-आ. काळेंचे आश्वासन

संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोनाच्या संकटाचा सामना करीत असतांना अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आलेल्या निसर्ग चक्री वादळाने कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे व नागरिकांचे नुकसान झाले असून तालुक्याच्या पूर्व भागाला फटका बसला असून झालेल्या नुकसानी बाबत मदत पुनवर्सन विभागाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून देणार असल्याचे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच आपदग्रस्तांना दिले आहे.
निसर्ग चक्री वादळाने झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.निसर्ग चक्री वादळाचा कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, खोपडी,तळेगाव मळे आदी गावांना फटका बसला आहे.या परिसरात वादळाचा जोर जास्त असल्याने काही गावातील नागरिकांच्या घरांचे छप्पर, पत्रे, उडून जावून कच्च्या घरांचे नुकसान झाले.
निसर्ग चक्री वादळाने झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जावून पाहणी केली.निसर्ग चक्री वादळाचा कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील धोत्रे, खोपडी,तळेगाव मळे आदी गावांना फटका बसला आहे.या परिसरात वादळाचा जोर जास्त असल्याने काही गावातील नागरिकांच्या घरांचे छप्पर, पत्रे, उडून जावून कच्च्या घरांचे नुकसान झाले आहे.तसेच शेतकऱ्यांचे पॉलीहाऊस, कांदाचाळ व ऊस पिकांचे व फळ बागांचे नुकसान झाले आहे.या सर्व नुकसानीची पाहणी करून निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात झालेल्या सर्व नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी आदेश दिले आहे.२०१९ ला झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्याला शेतकऱ्यांना मदत पुनवर्सन विभागाकडून २७.९५ कोटी रुपयांची मदत मिळवून दिली असून त्याप्रमाणे झालेल्या नुकसानीबाबत पाठपुरावा करून नुकसान ग्रस्त नागरिकांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त शिनगर,तळेगाव मळेचे सरपंच सचिन क्षीरसागर,बाळासाहेब वारकर,गणेश घाटे,तलाठी सुशील शुक्ला,नुकसानग्रस्त नागरिक सुरक्षित आंतर पाळुन उपस्थित होते.