निधन वार्ता
कर्मवीर कारखान्याचा कर्मचारीं अपघातात ठार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सहकारात अग्रणी असलेला कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या लेखा विभागाचे कर्मचारी अशोक कारभारी कांदळकर (वय-५९) मूळ रा.कांदळस ता.निफाड यांचे आज दुपारी चार वाजेच्या सुमारास कारखाना स्थळावर मोटारसायकलला गतिरोधकावर कुत्रा आडवा येऊन झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले असून त्याना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून नेत असताना निधन झाले आहे.
स्व.अशोक कांदळकर हे आपल्या कर्तव्यावर असताना हा अपघात झाला हि घरी असताना झाला हे समजले नाही.तथापि कार्यकारी संचालक यांचे जुन्या बंगल्यासमोर असलेल्या गतिरोधकावर कुत्रे आडवे गेल्याने हि दुर्घटना झाली आहे.असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.त्यांना अपघात झाला असताना नजीकच्या अन्य सुरक्षा रक्षकाने पहिले व त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचे रस्त्यातच निधन झाले आहे.
स्व.अशोक कांदळकर हे आपल्या कर्तव्यावर असताना हा अपघात झाला हि घरी असताना झाला हे समजले नाही.तथापि कार्यकारी संचालक यांचे जुन्या बंगल्यासमोर असलेल्या गतिरोधकावर कुत्रे आडवे गेल्याने हि दुर्घटना झाली आहे.असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.त्यांना अपघात झाला असताना नजीकच्या अन्य सुरक्षा रक्षकाने पहिले व त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचे रस्त्यातच निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात त्याना भरती केले असताना उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याना तपासणी केल्यावर मृत घोषित केले आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्य नोंद क्रं.४९/२०२० सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे हे करीत आहेत.त्यांच्या पच्छात पत्नी,एक मुलगा,तीन मुलीसह अन्य नातेवाईक असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.