निधन वार्ता
दौलत सिनगर यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील प्रगतिशील शेतकरी दौलत काशिनाथ सिनगर (वय-73 वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात पाच भाऊ,तीन बहिणी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.त्यांच्यावर भोजडे येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.दौलत सिनगर हे अंत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून भोजडे आणि परिसरात परिचित होते.त्यांनी अत्यंत प्रतिकुल काळात आपल्या भावंडांचा आणि मुलांचा सांभाळ केला होता.त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले आहे.
स्व.दौलत सिनगर हे अंत्यंत धार्मिक आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून भोजडे आणि परिसरात परिचित होते.त्यांनी अत्यंत प्रतिकुल काळात आपल्या भावंडांचा आणि मुलांचा सांभाळ केला होता.त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले आहे.त्यांच्या अंत्यविधी समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या पश्चात पत्नी ठकुबाई सिनगर,भाऊ सर्जेराव सिनगर,शिवाजी सिनगर,संभाजी सिनगर,बाळासाहेब सिनगर आदी भाऊ तर मुलगा शुलेश्वर सिनगर तर रंजना बाळासाहेब पानसरे,मंदाबाई रामनाथ वाणी,सुनीता किसन घागरे आदी तीन मुली,नंतवडे असा परिवार आहे.



