निधन वार्ता
उत्तमराव चरमळ यांना मातृशोक

न्यूजसेवा
संवत्सर- (वार्ताहर)
कोपरगांव भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव चरमळ यांच्या मातोश्री इंदुबाई रायभान चरमळ (वय-75) यांचे काल सोमवार दिनांक 01 डिसेंबर रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले आहे.आज सकाळी दहा वाजता पढेगांव येथील अमरधाममध्ये त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.यावेळी मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

स्व.इंदुबाई चरमळ यांनी मुलांचा सांभाळ केला होता.मुलांना उच्चशिक्षित केले.आपल्या मनमिळावू स्वभावाने त्यांनी पढेगांव परिसरात एक यशस्वी गृहिनी म्हणून नावलौकीक मिळविला होता.त्यांच्या पश्चात संजीवनी साखर कारखान्याचे माजी अकौंटंट बाबासाहेब चरमळ,संजीवनी कारखान्याचे माजी शेतकी ओव्हरसियर व सटाणा साखर कारखान्याचे शेतकी अधिकारी वसंतराव चरमळ,कोपरगांव पंचायत समितीचे माजी सदस्या अलका उत्तमराव चरमळ या स्नुषा,बाळासाहेब चरमळ व ज्ञानदेव चरमळ ही पाच मुले,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.संवत्सर येथील पत्रकार शिवाजी गायकवाड यांच्या इंदुबाई ह्या मावस भगिनी होत्या.
पढेगांव येथील अमरधाममध्ये पार पडलेल्या अंत्यसंस्कार प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य केशव भवर,गोदावरी खोरे दूध संघाचे माजी संचालक गोरनाथ शिंदे,कोपरगांव बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम आदींनी त्यांच्या अंत्यविधी प्रसंगी श्रद्धांजली वाहिली आहे.स्व.इंदुबाई चरमळ यांच्या निधनाबद्दल गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,आ.आशुतोष काळे,माजी आ.स्नेहलता कोल्हे आदिंनी दुःख व्यक्त केले आहे.

