जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत पंपाची चोरी,कोपरगावात गुन्ह्याची नोंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे शिवारात गट क्रं.१२७ च्या विहिरीतून दि.१८ जानेवारी रोजी रात्री ०८ ते १२ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सुमारे ०५ हजार रुपये किमतीचा तीन अश्वशक्तीचा विद्युत पंप चोरून नेला आहे.या प्रकरणी फिर्यादी सतीश रावसाहेब दिघे यांनी गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने विद्युत पंप धारक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी डोके वर काढले असून त्यांचा उपद्रव शेतकऱ्यांना ऐन रब्बी हंगामांत सोसावा लागतं आहे.या पूर्वी कोपरगाव शहरातील काही तरुणांनी असेच विद्युत पंप चोरी करण्याचा सपाटा सुरू केला होता.त्यांच्यावर पोलिसांनी पाळत ठेवून सदर टोळी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी पकडली होती.आता पुन्हा एकदा या चोरट्यांनी डोके वर काढले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांत चिंता पसरली आहे.

सदर टोळी सदर विद्युत पंपाची तांब्यांची तार काढून ती परस्पर विकत असल्याची घटना उघडकीस आणली होती.त्यानंतर बराच काळ या चोऱ्या थांबल्या होत्या.मात्र या वर्षी पुन्हा रब्बी हंगामात हा उपद्रव शेतकऱ्यांना सुरु झाला आहे.त्याबाबत देर्डे कोऱ्हाळे येथील शेतकरी सतीश दिघे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.क्रं.४२/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.व्ही.एन.कोकाटे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close