जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
दळणवळण

विविध विकास कामांसाठी…इतका निधी मंजूर-आ.काळेंची माहिती

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)    

कोपरगाव शहरासह तालुक्यातील विविध विकास विकासकामांसाठी वैशिष्टेपूर्ण योजने अंतर्गत १० कोटी निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

कोपरगाव तालुक्यातील विकासाचा अनुशेष मोठया प्रमाणावर बाकी होती.सन-२०१४ साली विधानसभा निवडणूकीत विजय मिळाल्यावर त्यांनी अनेक कामे मंजूर केली असून रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यात त्यांना यश आल्याचे दिसत असून त्यांनी नुकताच महायुती सरकारकडून १० कोटी निधी मिळवला आहे.

सदर निधीतून कोपरगाव शहरातील व्यापारी संकुल,विविध रस्ते,समाज मंदिर,सामाजिक सभागृह,शहर सुशोभिकरण तसेच हद्दवाढ झालेल्या भागाचा देखील विकास कामे होणार आहे.


यामध्ये कोपरगाव शहरातील कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील जब्रेश्वर मंदिर ते आण्णाभाऊ साठे पुतळा रस्ता डांबरीकरण करणे (१.५० कोटी),कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील कोपरगांव बस स्टॅन्ड ते हॉटेल स्पॅन पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (५० लक्ष),प्र.क्र.१ मधील आय.टी.आय.कॉलेज समोरील रस्ता खडीकरण,डांबरीकरण करणे (४० लक्ष),नगरपालिका हद्दवाढ झालेल्या भागातील नागरे पेट्रोल पंप ते ब्रिजलाल नगर रस्ता डांबरीकरण करणे (३० लक्ष), प्र.क्र.१४ मधील गोदावरी नदी ते नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे (४० लक्ष),प्र.क्र.१०मधील सर्व्हे नंबर १०५ मध्ये श्री हनुमान मंदिर व माऊली मंगल कार्यालय परिसर सुशोभिकरण करणे (१० लक्ष),प्र. क्र.०३ ठक्कर घर ते साईबाबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष), प्र.क्र.३ व्यापारी धर्मशाळा दक्षिण बाजू रस्ता काँक्रिटीकरण करणे (१० लक्ष), प्र.क्र.२ स्वामी समर्थ मंदिर सुभद्रानगर (२०४) सामाजिक सभागृह बांधणे (१० लक्ष),प्र.क्र.०८ संजय नगर वडार समाज सर्व्हे नंबर २२२५ समाज मंदिर बांधणे (१० लक्ष), भावसार समाज साई लक्ष्मी नगर प्रभाग क्र.२ समाज मंदिर बांधणे (१० लक्ष), वसिम खाटिक घर ते शकील शेख घर रस्ता मजबुतीकरण करणे.प्रभाग क्र.७ (१५ लक्ष),फकीर कुरेशी ते हाजी मंगल कार्यालय रस्ता डांबरीकरण करणे प्रभाग क्र.८ (१० लक्ष),कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील आरक्षण क्र.३८ मध्ये पोस्टाजवळ भाजी मार्केट व व्यापारी संकुल उभारणी करणे (०१ कोटी), कोपरगांव नगरपरिषद हद्दीतील बाजारतळ आरक्षण २९ मध्ये व्यापारी संकुल बांधकाम करणे (०१ कोटी),सर्व्हे नंबर १०५ मध्ये सुशोभिकरण करणे (इंडोर गेम हॉल) (०१ कोटी), सर्व्हे नंबर १९५/१४ मध्ये गुजराथी समाजासाठी समाज मंदिर बांधकाम करणे (१०लक्ष),नगरपालिका नवीन प्रशासकीय इमारत फर्निचर करणे (१.५० कोटी),गजानन नगर गोरोबा नगर रस्त्यावरील सि.डी. वर्क करणे (३० लक्ष), सर्व्हे नंबर १०५ प्रभाग क्र. १२ मधील उर्दू शाळा बांधकाम करणे (३० लक्ष), सर्व्हे नंबर १०५ प्रभाग क्र. १२ मध्ये लिंभारा मैदान जवळ श्री स्वामी समर्थ मदिर परिसर सुशोभिकरण करणे व पेव्हर ब्लॉक बसविणे (१० लक्ष), सर्व्हे नंबर १०५ प्रभाग क्र. १२ दत्तनगर मध्ये श्री दत्त मंदिर परिसर सुशोभिकरण करणे (१० लक्ष), प्रभाग क्र.३ सैनिकी वसतीगृह ते चित्रकला महाविद्यालय रस्ता डांबरीकरण करणे (२५ लक्ष), प्रभाग क्र. ३ मधील साईबाबा मंदिर ते खंडोबा मंदिर रस्ता कॉक्रिटीकरण करणे (२० लक्ष), प्रभाग क्र. ३ मधील सर्व्हे नंबर १९१६/१९१७ सामाजिक बौद्ध समाजासाठी बुद्धविहार बांधणे (१० लक्ष), प्रभाग क्र. ८ मधील सर्व्हे नंबर १८/ ९२ अरफात मस्जिद बांधणे (१० लक्ष) हि विकास कामे होणार आहेत.

कोपरगाव शहराच्या विविध प्रभागातील प्रलंबित विकास कामांना मंजुरी मिळाल्याबद्दल तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close